भूमि अभिलेख विभागाचे वतीने तलाठी (गट क) पदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे.या परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये घेण्यात येतील. परीक्षेची घेण्याबाबत तयारी पूर्ण करण्यात आलेली,असून उमेदवारांना परीक्षेच्या किमान दहा दिवस आधी केंद्राचे नाव प्राप्त होईल परीक्षा पत्र आणि केंद्राची माहिती परीक्षेच्या तीन दिवस आधी उमेदवार यांना दिली जाईल.
परीक्षा तीन सत्रा मध्ये घेतली जाईल. संपूर्ण राज्यातून तलाठी पदाचे 4466 पदांसाठी अकरा लाख दहा हजार 53 उमेदवार येणार आहेत,त्यामुळे उमेदवारांना परीक्षा चांगल्या प्रकारे देता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असूनही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे.
असे असणार परीक्षेची टप्पे.
सत्र | वेळ |
पहिला टप्पा | 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट. |
दुसरा टप्पा तिसरा टप्पा | 26 ऑगस्ट 1 सप्टेंबर.2023. तिसरा टप्पा- 4 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर त्यापैकी दिनांक 23,24 आणि 25 ऑगस्ट रोजी तर दिनांक 2,3,7,9, 11 12 आणि 13 सप्टेंबर या दिवशी परीक्षा होणार नाही. |
परीक्षा एका दिवसात तीन सत्रात होईल
सत्र | वेळ |
सकाळी | ९ ते ११ |
दुपारी दुपारी | 12.30 ते 2.30. 4.30 ते सायंकाळी ,6.30 ही वेळ ठरवण्यात आलेली आहे. |
परीक्षा केंद्राच्या आवारात नेटवर्क बंद
परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये आणि ऑनलाईन परीक्षेचा वेळेस परीक्षा केंद्राचा पाचशे मीटर पर्यंत नेटवर्क ज्यामर लावण्यात येणार आहे.उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण अगोदर कळवले जाणार असून. परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकीट बरोबरच दिसेल परीक्षा केंद्रावर कसलाही अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठीही लक्षात घेण्यात आलेली आहे.
सूचना
- टीटीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
- आत्तापर्यंत शिक्षक,तलाठी , इत्यादीया विभागाचे ऑनलाईन परीक्षे दरम्यान ऑनलाईन झालेले अनुसूचित प्रकार आणि इतर घटनांची पार्श्वभूमी पाहता आता परीक्षा केंद्रावर जाताना कोणती इलेक्ट्रॉनिक उपक्रम मोबाईल किंवा घड्याळे देखील देण्यास बंदी आहे .
- उमेदवार वर्ग खोल्यात बसल्यानंतर पंधरा मिनिटानंतर प्रश्नावली दिली जाईल.
- प्रत्येक प्रश्नावली वेगवेळी असून या नियोजनानुसार वेगवेगळे सेट तयार केले आहेत.
- तसेच परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर परिसरात जामर बसवण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त तसेच राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
Post a Comment