नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत आहे,आज पर्यंत आपण बऱ्याच सरकारी योजना व शिष्यवृत्ती बाबत माहीती पाहीली आहे, आज आपण अशाच एका शिष्यवृत्ती बाबत माहीती अभ्यासणार आहोत.या शिष्यवृत्ती चे नाव आहे अस्वच्छ व्यवसाय.
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्यात 1978 पासून सुरू करण्यात आलेली आहे.सध्यस्थितीत हाताने मेहतर काम करणाऱ्या व्यक्ती अस्वच्छ व्यवसायाशी संबंधित भंगी व्यवसाय,सफाई कामगार, कातडी कमावणारे, व कातडी सोलणारे हा व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना सदर शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात येत होता.परंतु केंद्र शासनाच्या 2013 चे पत्र मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये कचरा गोळा करणे कचरा उचलणे हा व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील शिष्यवृत्ती चा लाभ घेता येणार आहे.
![]() |
लाभार्थी
- अस्वच्छ व्यवसाय करत असलेल्या पालकांच्या पाल्यांना सदरील शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
- अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती लाभ इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे विद्यार्थी लाभ घेऊ शकतात.
लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम
- अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती ही वार्षिक तीन हजार रुपये प्रमाणे मिळते.
- अस्वच्छ व्यवसायासाठी मुख्याध्यापक मार्फत अर्ज करावा.
योजनेचे स्वरूप
- सदर योजनेत अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या दोन पाल्यांना लाभ घेता येतो.
- केंद्र स्तर 50% म्हणजेच 1500 रुपये व राज्यस्तर 50 % म्हणजेच रुपये 1500 याप्रमाणे दहा महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये( अक्षरी तीन हजार रु.)शिष्यवृत्ती दिली जाते.
- ही शीष्यवृती इयत्ता पहिली ते दहावी ( १ ली ते १० वी ) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
पात्रता अटी व शर्ती
- पालक हे कातडी कमावणे कातडी सोलणे मैला वाहून नेणे सफाई करणे व कचरा कागद गोळा करणे काच जमा करणे , यासारखे अस्वच्छ व्यवसाय करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभधारकाचे पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीने ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर जावक क्रमांकाचे अस्वच्छ व्यवसाय करत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शहरी भागातील अस्वच्छ व्यवसाय करणारे व्यक्तींना ग्रामसेवक नगरपालिका मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त उपायुक्त प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- स्वयम घोषीत उत्पन्नाचे प्रमाण पत्र.
- एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त मुलांना लाभ देता येत नाही
- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुज्ञेय नाही
- जातीची अट नाही
- शिष्यवृत्ती फॉर्म सोबत मागील वर्षी उतीर्ण झाल्याच्या गुणपत्रकाची सत्य प्रत.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती अर्ज कोठे व कोणामार्फत करावा.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीसाठी अर्ज हा अस्वच्छ व्यवसाय करत असलेल्या पालकांचा पाल्य ज्या शाळेत शिक्षण घेत आहे त्या शाळेच्या मुख्यध्यापक / प्राचार्य मार्फत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती बाबत अधिक माहीती कोणाकडून प्राप्त करावी.
- शाळेचे मुख्यध्यापक
- पंचात समिती (समाजकल्याण विभाग प्रमुख)
- जिल्हा परिषद (समाज कल्याण विभाग)
Post a Comment