इयत्ता ५ वी ८ वी मध्ये होणार वार्षीक परीक्षा

नमस्कार सरकारी अपडेट मध्ये सर्व मित्रमंडळींचे स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आरटीइ कायद्या (RTE ACT) नुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण पास करत होतो, पण यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारित आरटीई नियम जारी केला आहे, यामध्ये आपण इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची तरतूद ठेवली आहे सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.5th & 8th exam

ढकल पास करणे बंद आता इयत्ता पाचवी व आठवीला होणार परीक्षा.

इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाची होणार परीक्षा पास नाही झाला तर विद्यार्थी होणार नापास.

इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आतापर्यंत आपण इयत्ता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करत होतो परंतु आता असं करता येणार नाही आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गामध्ये विद्यार्थी जर नापास झाला तर त्याला त्याच वर्गात ठेवण्याचा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणानुसार जाहीर करण्यात आलेला आहे.

राईट टू एज्युकेशन मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते पण आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे.

नापास विद्यार्थ्यांना दिली जाणार पुन्हा संधी.

.राज्य शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करून पाचवी व आठवी येथे मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार आहे.

पुनर्पपरीक्षेत विद्यार्थी नापास /अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गातच त्या विद्यार्थ्यांना ठेवले जाणार आहे. शिक्षण विभागाच्या राज्य पत्रानुसार इयत्ता पाचवी तील विद्यार्थ्यांना वायररूप वर्गात प्रवेश दिला जाईल सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण/ पास होणे हे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. याबाबत शासनाकडून अद्यावत माहिती जारी करण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन याची कार्यपद्धती निश्चित करेल.

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.





सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी / whatsapp ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.



















Post a Comment

Previous Post Next Post