RTE ACT 2009 नुसार 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न नेहमीच चालू असतात.नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी समावेशीत शिक्षण या उपक्रमा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सामान्य मुलांप्रमाणे सामान्य शाळेत होताना दिसत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी व त्यांचे मॅट्रिक पूर्व शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आज आपण पाहणार आहोत.इयत्ता (1ते10) पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग शिष्यवृत्ती योजना ची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.
![]() |
दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना.
दिव्यांग समाज कल्याण योजना विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकून ठेवणे व पालकांना त्यांच्या पाल्याचे शिक्षणाबाबत आवड व रुची निर्माण होणे हा या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे.
शिष्यवृत्ती मिळणारी रक्कम
दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती चा प्रतिवर्षी दहा महिन्यासाठी लाभ घेता येतो.- इयत्ता पहिली ते चौथी रू.100 दर महा
- इयत्ता पाचवी ते सातवी 150 रू दर महा
- इयत्ता आठवी ते दहावी रू 200.दर महा
- मतिमंद रू 150.दर महा
एकुण १० महीण्यासाठी मिळणारी रक्कम
- इयत्ता १ ते ४ ( पहिली ते चौथी) एकूण वार्षिक १००० रु.(एक हजार रुपये)
- इयत्ता ५ ते ७ ( पाचवी ते सातवी) १५०० रु (एक हजार पाचशे रुपये)
- इयत्ता ८ वी ते १० वी (आठवी ते दहावी) २००० रु ( दोन हजार रुपये)
पात्रता व अटी व शर्ती
- विद्यार्थी पहीली ते दहावी मध्ये कोणत्याही वर्गामध्ये शिकणारा असावा.
- दिव्यांग विद्यार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे कमीत कमी 40% असावे..
- दिव्यांगाचे 21 प्रकारातील लाभार्थी अर्ज करू शकतो.
- शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी शाळेतील वार्षिक उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट नाही.
दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे मार्कशीट.
- शाळेचे बोनाफाईड व उपस्थिती प्रमाणपत्र
इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंग समाज कल्याण शिष्यवृत्ती विभागामार्फत सदरील शिष्यवृत्ती देण्यात येते. दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती चा अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत.
1. नवीन अर्ज करण्यासाठीचा दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म पीडीएफ डाऊनलोड करा.
२.अपंग समाज कल्याण शिष्यवृत्ती नूतनीकरण फॉर्म पीडीएफ डाउनलोड करा.
अर्ज कोठे व कोणा मार्फत करावा.
दिव्यांग शिष्यवृत्ती चा फॉर्म पूर्णपणे अचूक भरून मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्याद्वारे पंचायत समिती समाज कल्याण विभागाकडे सादर करावा.दिव्यांग समाज कल्याण शिष्यवृत्ती बाबत अधिक माहिती कोणाकडून प्राप्त करावी.
- शाळेचे मुख्याध्यापक.
- पंचायत (समिती समाज कल्याण विभाग प्रमुख)
- जिल्हा परिषद समाज (कल्याण विभाग)
Post a Comment