राज्य सरकारने बाल संगोपन योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे.आता बाल संगोपन ही सरकारी योजना क्रांती ज्योती सावीत्रीबाई फुले बाल संगोपन या नावाने ओळखली जाणार आहे. या बाबत राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाने सुधारीत शासन निर्णय दिनांक 30.मे 2023 रोजी निर्गमित केला आहे. या विषयी अधिक माहिती पाहुया.
बाल संगोपन योजना BAL SANGOPAN YOJANA 2024
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत
- अनाथ बालके ज्या मुलांना आई, वडील नाही ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही असे बालके.
- एक पालक असलेले मुले आई,वडील यांपैकी एक जन आहे. एका पालकाचा मृत्यु झाला आहे, आई वडिलांचा घटस्पोट झालेला आहे.
- शाळेत न जाणारी रस्त्यावर राहणारी मुले.
- दोन्ही पालक दिव्यांग असलेली मुले.
- कौटुंबिक हिंसाचार च्या प्रकरणात गुंतलेल्या पालकांची मुले.
- तीव्र मतीमंद असलेले मुले एड्स किंवा कर्करोग झालेले मुले,४० % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले अंध/ दिव्यांग मुले.भिक्षा मागणारे मुले, नैसर्गिक आपत्ती मध्ये एक पालक किंवा दोन्ही पालक गमावालेले मुले.
- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणारा लाभ रु.११५० ऐवजी आता मिळणार प्रती महिना २२५० रु.
शासन निर्णय महीला व बालविकास विभाग क्र. दि.१७/०२/२०२१ बालसंगोपन योजने अंतर्गत प्रती बालक दर महा ११५०/- रु वरून २२५०/- रु व स्वयंसेवी संथेच्या सहाय्यक अनुदानातून १२५ रु वरून रु 250 रु या प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.या योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून मुलांना अन्न, वस्र , निवारा शैक्षणिक,वैद्यकीय सोयी सुविधा कुटुंबाला देण्यात याव्यात.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची काळ मर्यादा
अनाथ, स्वतः किंवा दोन्ही पालक दिव्यांग असलेली मुले, स्वतः किंवा दोन्ही पालक एड्स किंवा कर्करोग ग्रस्त असलेली मुले, कुष्ट रोग झालेल्या पालकाची मुले किंवा तीव्र मतीमंद असलेले मुले, अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत सदर योजनेचा लाभ घेता येतो.
कौटुंबिक कलहात सापडलेल्या बालकांना कौटुंबिक कलह संपुष्टात आलेल्या न्यायालयीन आदेश निर्गमित झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत किंवा मुलाच्या 18 वर्षापर्यंत या पैकी जे आधी घडेल तो पर्यंत सदरील योजनेचा लाभ घेता येईल.
जन्म ठेपेची शिक्षा किवा इतर शिक्षा भोगत असलेल्या तुरुंगातील पालकाच्या मुलांना पालकाची शिक्षा संपल्यापासून सहा महिन्या पर्यंत किंवा मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत लाभ घेता येईल.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र.
- अनाथ,निराधार बेघर , संरक्षणची व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थीचा रहिवासी दाखला ( तलाठी / ग्रामसेवक / नगरसेवक / सरपंच यांनी निर्गमित केलेला.)
- लाभार्थ्याचे व पालकाच्या आधार कार्डची छायांकित प्रत.
- तहसीलदाराचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन हे अडीच लाखापेक्षा कमी असावे)
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला प्रधान्य दिले जाते.
- आई / वडील यांचा म्रुत्यु दाखला.
- पालकासोबतचा कुटुंबाचा घरासमोरचा एक फोटो.
- मुलाचा जन्म तारखेचा दाखला,/ शाळा सोडल्याचा दाखला,मागच्या इयत्तेचे गुणपत्रक.
- बँक खाते क्रमांकाची (पास बुकची) छायांकित प्रत.
- 3 ते 18 वयोगटातील लाभार्थी शिक्षण घेत असल्यास शाळेचे गुणपत्रक/ बोनाफाईड सोबत जोडावे.
योजनेसाठी अर्ज कोठे करावा.अंगणवाडी सेविका , स्वयंसेवी संस्था , जिल्हा महीला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,(नागरी, ग्रामीण आदिवासी) किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
Post a Comment