राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना बाबत आपण सविस्तर माहीती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासन पुरोगामी विचारधारा घेऊन समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन स्तरावर नियमित प्रयत्न चालू असतात.त्याच प्रमाणे दुर्बल घटकाचा विकास करायचा असेल तर त्यांच्या समाजातील मुला मुलींचे शिक्षण हे गुणवत्ता पुर्ण व चांगले होणे आवश्यक आहे.त्या दृष्टिकोनातून समाजीकन्याय विभागामार्फत शैक्षणिक सोयी सुविधांच्या योजना राबिविण्यात येत आहे.फक्त शैक्षणिकच नाही तर सामाजीक व आर्थिक स्तर सुधारण्यासाठी ही योजना राबिविण्यात येत आहे.या विभागामार्फत राजश्री शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजीक न्यान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून राज्य शासनामार्फत राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना दिली जाते.
राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
समाजातील अनुसुचीत जाती व नवबोद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा त्यांच्या गुणवत्तेममध्ये वाढ व्हावी आज च्या स्पर्धेच्या युगात सर्व साधारण विद्यार्थ्यान सोबत टिकून रहावे यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या व शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकून राहणे शालेय शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होणे यासाठी राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना 11 जुन २००३ पासून सुरु करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती लाभार्थी
- इयत्ता १० वी मध्ये 75 % किंवा या पेक्षा अधिक गुण मिळवुन 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींसाठी .
- अनुसुचित जाती , विशेष मागास प्रवर्ग आणि VJNT च्या मुला मुलींसाठी.
- इयत्ता 11 वी व १२ मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबोद्ध मुला मुलींसाठी
- इयत्ता 11 वी व १२ मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती ,नवबोद्ध मागास प्रवर्ग , आणि VJNT च्या मुला मुलींसाठी.
मिळणारी रक्कम
राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ही १० महिन्यासाठी 3000/-रु तीन हजार रु मिळते.
अटी व शर्ती
- महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
- कुटुंबाचे उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असावे.
- इयत्ता १० वी १२ वी ची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ राहील किंवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक.
- वेळोवेळी योजनेच्या अनुषगाने निर्गमित झालेल्या अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधन कारक राहतील.
- शिष्यवृत्ती साठी विहित नमुन्यातील अर्ज विध्यार्थ्यानी भरणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा परिषद ( सामाजिक न्याय विभाग )
पंचायत समिती (सामाजिक न्याय विभाग )
विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य
Post a Comment