नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट मध्ये आपले स्वागत आहे या अगोदर आपण राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबत सविस्तर माहिती पाहिली आहे, तसेच आज आपण राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या बाबत माहिती पाहणार आहोत.राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार Rajarshi Shahu Maharaj Merit Award हा इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून (SC,VJNT,SBC) अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गाचे विद्यार्थी हे राज्यात विभागीय मंडळात जिल्ह्यात तालुक्यात शाळेत प्रथम येणाऱ्या तसेच विभागीय मंडळाचे गुणोत्तर यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
Rajarshi Shahu Maharaj Merit Award राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्याचा निर्णय हा २००३-२००४ मध्ये घेण्यात आलेला आहे, तेव्हापासून हा पुरस्कार प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला जातो.
पुरस्काराबद्दल अधिक माहिती पाहूया.Rajarshi Shahu Maharaj Merit Award ![]() |
लाभार्थी /पात्रता
- सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास म्हणजे जर संपूर्ण राज्यातून पहिला आलेला विद्यार्थी हा अनुसूचित जाती विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील असेल तर त्या विद्यार्थ्याला Rajarshi Shahu Maharaj Merit Award राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
- अनुसूचित जाती विजाभज विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थी.
- सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डामधुन प्रथम आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
- सर्वसाधारण विद्यार्थी मधून जिल्ह्यातून प्रथम आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास म्हणजे जर जिल्ह्यात पहिला आलेला विद्यार्थी हा अनुसूचित जाती विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील असेल तर त्या विद्यार्थ्याला राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
- सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यात प्रथम आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास म्हणजेच जर तालुक्यात पहिला आलेला विद्यार्थी हा अनुसूचित जाती विजाभजा व विशेष प्रवर्गातील असेल तर त्या विद्यार्थ्याला Rajarshi Shahu Maharaj Merit Award राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
- सर्वसाधारण विद्यार्थी मधून शाळेमध्ये प्रथम आलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यास म्हणजेच जर शाळेत त पहिला आलेला विद्यार्थी हा अनुसूचित जाती विजाभजा व विशेष मागास प्रवर्गातील असेल तर त्या विद्यार्थ्याला
- Rajarshi Shahu Maharaj Merit Award राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
- प्रत्येक बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनुसूचित जाती विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यास म्हणजे जर विद्यार्थी बोर्डाचे गुणोत्तर यादीत आलेल्या विद्यार्थी अनुसूचित जाती विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील असतील तर त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता पुरस्कार दिला जातो.
Rajarshi Shahu Maharaj Merit Award राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारअंतर्गत मिळणारी रक्कम
- राज्यस्तर प्रथम - रुपये २५००००/- अक्षरी दोन लक्ष पन्नास हजार रुपये, स्मुर्ती चिन्ह,प्रमाण पत्र.
- प्रत्येक बोर्डातून प्रथम - रुपये १०००००/- अक्षरी एक लक्ष रुपये स्मुर्ती चिन्ह,प्रमाण पत्र.
- प्रत्येक बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम -रुपये ५००००/- अक्षरी पन्नास हजार रुपये.
- जिल्ह्यातून प्रथम -रुपये २५०००/-अक्षरी पंचवीस हजार रुपये स्मुर्ती चिन्ह,प्रमाण पत्र.
- तालुक्यातून प्रथम -रुपये १००००/- अक्षरी दहा हजार रुपये स्मुर्ती चिन्ह,प्रमाण पत्र.
- शाळेतून प्रथम - रुपये ५०००/- अक्षरी पाच हजार रु स्मुर्ती चिन्ह,प्रमाण पत्र.
आवश्यक कागदपत्र
- राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा प्रस्ताव शाळा व महाविद्यालयाकडून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यात यावा.
- प्रस्तावासोबत विद्यार्थ्यास सक्षम प्राधिकार्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र.
- गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत.
- विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला.
- मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत.
- विद्यार्थ्याचे खाते पुस्तकाचे झेरॉक्स प्रत.
राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार पत्र.pdf येथे डाऊनलोड करा
Post a Comment