महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर द्वारा महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय,भटक्या जाती,विमुक्त जमाती,तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना.MHT-/JEET/NEET-2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती या संस्था तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी डाटा इंटरनेट डेटा पुरविण्यात येतो.या बाबत सविस्तर माहीती पाहणार आहोत.
योजनेच्या लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता पुढीलप्रमाणे.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
- विद्यार्थी नोंद क्रीमियर उत्पन्न गटातील असावा.
- जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून, त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र(बोनाफाईट सर्टिफिकेट) व दहावीची गुणपत्रिका जोडावी.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका.
- अकरावी ज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र.
- आधार कार्ड.
- जातीचे प्रमाणपत्र.
- वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
अर्ज कसा करावा याबाबत माहिती पाहूया.
1. महाज्योती संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application for MHT-/JEET/NEET-2025 Trening या पर्यायाला क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्जासोबत व मध्ये नमूद कागदपत्रे सॉक्संकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावी.
नियम व अटी.
- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.
- पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- ऑनलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.
- जाहिरात रद्द करणे मदत वाढ देणे अर्ज नाकारणे व सुकन्या बाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
अर्ज भरताना कोणतेही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महा ज्योती कॉल सेंटर वर संपर्क करावा.
- संपर्क क्रमांक.0712-2870120/21.
- E-Mail-Id=mahajyotijeeneet24@gmail.com
Post a Comment