प्रस्तावना
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय मुलींचे (अनुसूचित जाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती धनगर वंजारी व विशेष मागास प्रवर्ग) माध्यमिक शाळा मधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता 8 वी ते १० वीतील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय दिनांक २५ जुलै 2003 अन्वये सुरू करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर इतर मागास प्रवर्गातील मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, त्यांचा शैक्षणिक सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्यातील इयत्ता आठवी ते दहावी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास मा. मंत्रिमंडळाने दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून ' सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना " लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
सदरील शिष्यवृत्ती ही इयत्ता 5 वी ते 10 मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी लागू आहे.
savitribai fule shishyvruti yojana सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी पात्र लाभार्थी.
- savitribai fule shishyvruti yojana सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही अनुसूचित जातीच्या मुली. (S.C.)
- इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या मुली.(OBC)
- भटक्या व विमुक्त जातीच्या (VJNT ) मुली तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) मुली.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही.
- आवश्यक कागदपत्र.सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्य मार्फत विहित नमुन्यात प्रपत्र भरून देणे.
- शिष्यवृत्तीचे प्रपत्र जमा करताना जातीच्या प्रवर्गनिहाय व मुली शिकत असलेल्या वर्गनिहाय देणे आवश्यक आहे.
- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींचे प्रपत्र (SC) एकत्रीत देणे.
- इयत्ता 8 वी ते 10 वी शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींचे प्रपत्र (SC) एकत्रीत देणे.
- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय जातींच्या मुलींचे प्रपत्र (OBC) एकत्रीत देणे.
- इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय जातींच्या मुलींचे प्रपत्र (OBC) एकत्रीत देणे.
- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या भटक्या व विमुक्त जातीच्या (VJNT/SBC) मुलींचे प्रपत्र एकत्रीत देणे.
- इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या भटक्या व विमुक्त जातीच्या (VJNT/SBC ) मुलींचे प्रपत्र एकत्रीत देणे.
मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम.
- इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना दर महा 60 रू प्रमाणे एकुण दहा महिन्याचे 600. रुपये ( माहे जुन ते मार्च)
- इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी दरमहा 100 रुपये प्रमाणे दहा महिन्यांचे एकूण 1000 रुपये.( माहे जुन ते मार्च)
सदरील शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कोणा मार्फत करावा याबाबत माहिती पाहूया.मुली ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विहीत नमुन्यातील प्रपत्र भरून समाज कल्याण कार्यालय, समाज कल्याण शिष्यवृत्ती विभाग प्रमुख / तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्या कडे माहीती जमा करावी.
Post a Comment