प्रस्तावना
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय १.अनुसूचित जाती (SC) २. अनुसूचित जमाती (ST) ३. विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग (VJNT,SBC) मुले व मुलींचे माध्यमिक शाळा मधील गळतीचे प्रमाण रोखणे व शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकवुन ठेवण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे,

Pri Matrick Scholarship yojana मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती लाभार्थी
- सदरील शिष्यवृत्ती ही इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या SC,ST,VJNT,SBC मुले व मुलांसाठी आहे.
- मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही अनुसूचित जातीच्या मुले व मुली. (S.C.)
- अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या मुले व मुली.(ST)
- भटक्या व विमुक्त जातीच्या (VJNT ) मुली व मुलांसाठी तसेच विशेष मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी (SBC).
- मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही.
आवश्यक कागदपत्र.
- सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्य मार्फत विहित नमुन्यात प्रपत्र भरून देणे
- .शिष्यवृत्तीचे प्रपत्र जमा करतांना जातीच्या प्रवर्गनिहाय इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या मुलांची व मुलींची माहीती एकत्रीत देणे आवश्यक आहे.
- उदा. इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुले व मुलींचे प्रपत्र (SC) एकत्रीत देणे.
- इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीतील मुले व मुलींचे प्रपत्र (ST ) एकत्रीत देणे.
- इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या भटक्या व विमुक्त जातीच्या (VJNT) विशेष मागास प्रवर्ग (SBC) मुले व मुलींचे प्रपत्र एकत्रीत देणे.
- मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
Pri Matrick Scholarship yojana मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम.
- इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या मुले व मुलींना मॅट्रिक पूर्व परीक्षा शुल्क (परीक्षा फी ही, त्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात परत मिळते)
- मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती रक्कम ही प्रती विद्यार्थी प्रती वर्ष रु ४०५ आहे.
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा.
१.अनुसूचित जाती (SC) २. अनुसूचित जमाती (ST) ३. विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग (VJNT,SBC) मुले व मुलीं ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विहीत नमुन्यातील प्रपत्र भरून समाज कल्याण कार्यालय, समाज कल्याण शिष्यवृत्ती विभाग प्रमुख/ तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख यांच्या कडे माहिती जमा करावी.सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी / whatsapp ला क्लिक करून whatsapp ग्रुप जॉईन करा.
Post a Comment