दिव्यांगांना मिळणार स्मार्ट कार्ड (UDID CARD)

UDID म्हणजे काय, UDID साठी नोंदणी कुठे व कशी करावी, UDID फायदे या बाबत आज आपण सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत.सर्वात प्रथम आपले सरकारी अपडेट मध्ये स्वागत आहे,आपला आज चा विषय आहे UDID कार्ड/ दिव्यांग प्रमाणपत्र नोदणी कशी करावी चला तर आपण अधिक माहीती पाहुया .

UDID CARD

UDID म्हणजे काय

UNIQUE DISABILITY ID भारतामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे UDID म्हणजेच अपंग प्राण पत्र स्वालंबण कार्ड,देशातल्या दिव्यांग व्यक्तीसाठी हे त्यांचे एकाप्रकारचे ओळख पत्र आहे याला (दिव्यांग प्रमाणपत्र देखील म्हणतात) दिव्यांग प्रत्येक व्यक्तीला हे कार्ड प्राप्त करून देण्यासाठी ही योजना सुरु करून दिलेली आहे.दिव्यांग व्यक्ती च्या कामामध्ये समानता व एकनिष्टता येण्यासाठी सगळ्या स्तरांवर उदा.राज्यस्तर,जिल्हास्तर , तालुकास्तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी udid कार्ड हे आवश्यक आहे.

२०१६ च्या RPWD नुसार UDID कार्ड हे जिल्हा रुग्णालया मार्फत किंवा दिव्यांग व्यक्ती ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे त्या रुग्णालयातून प्राप्त करून घेऊ शकतो.
UDID योजना ही दिव्यांग व्यक्ती च्या अधिकारासाठी व शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी आहे,Universal ID म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते.
ही योजना दिव्यांग व्यक्ती आणि त्याच्या दिव्यांगाच्या प्रकारची ओळख देखील करून देते.

UDID चा फायदा/उद्देश काय आहे.

  • दिव्यांग व्यक्ती नवीन UDID साठी online नोंदणी करू शकतो.
  • दिव्यांग व्यक्ती शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनाचा लाभ घेऊ शकतो.
  • दिव्यांग व्यक्ती दिव्यांग प्रमाण पत्राचा कालावधी संपल्यानंतर प्रमाण पत्राचे नूतनीकरण सहज करू शकतो.
  • UDID कार्ड हे PAN कार्ड भारत साठी मान्य केले जाते.

UDID online नोंदणी साठी आवश्यक कागद पत्र

  • स्कॅन केलेला एक पासपोर्ट साईज फोटो
  • सही चा स्कॅन केलेला फोटो
  • अड्रेस प्रुफ साठी ( आधार कार्ड, डोमासईल प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना driving lincence)

UDID कार्ड /दिव्यांग प्रमाण पत्र / साठी online नोदणी कशी करावी.

पुढील लिंक ला क्लिक केल्यानंतर UDID चे एक पेज ओपेन होईल .
Register ला क्लिक करा नंतर समोर एक नवीन एक नवीन पेज दिसेल त्या मध्ये ४ विभागामध्ये माहीती भरायची आहे.
१.Personal Detailas (वैयक्तिक तपशील)
२.Disability Detailas अपंगत्वाचा तपशील)
३.Employment Detailas.(रोजगार तपशील)
4.Identity Detailas.(ओळख तपशील)वरील चार विभागामध्ये माहीती अद्यावत करून माहीती SUBMIT करावयाच्या अगोदर व्यवस्थीत व काळजीपूर्वक तपासून घ्यावी आपण भरलेली माहीती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर SUBMIT या पर्यायाला क्लिक करावे . माहीती SUBMIT केल्यानंतर शेवटी एक पावती व आपण भरलेला फॉर्म प्राप्त होईल.

या प्रमाणे आपण दिव्यांग प्रमाणपत्र स्वावलंबन कार्ड UDID कार्ड साठी सहज नोंदणी करू शकतो.


सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी / whatsapp ला क्लिक करून whatsapp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

Previous Post Next Post