प्रस्तावना
इयत्ता पहिली ते दहावी (ई १ ली ते १० वी ) मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकारची D.N.T. Dr.Ambedkar pri matrick scholarship डॉ.आंबेडकर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील गरीब कुटुंबातील अनेक मुलांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते त्यामुळे अशी गरीब कुटुंबातील मुले शाळेत नियमित जाऊ शकत नाही अशा गरीब विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने भारत सरकारची Dr.Ambedkar pri matrick scholarship डॉक्टर आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2014 -15 पासून सुरू केलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाने सन 2016 -17 या वर्षापासून सुधारित केली आहे केंद्र शासनाची सदर योजना राज्यात लागू करण्याची बाब शासनाचे विचारधिन असल्यामुळे दिलेल्या निदर्शनानुसार भारत सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
Dr.Ambedkar pri matrick scholarship डॉ.आंबेडकर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना अटी व शर्ती
- या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शासनाच्या मान्यताप्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येतो.
- सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाच्या उत्पन्नाची मर्यादा ही वार्षिक रुपये दोन लक्ष इतकी आहे.
- विद्यार्थी अनुत्तीर्ण / नापास झाल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यास इतर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सदर योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचे रक्कम वितरित करताना ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येईल.
- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्या पासून ते शाळा सोडल्याच्या दिनांक पर्यंत दिर्घ मुदतीची सुट्टी वगळता शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यासाठी लागू राहील.
- एकदा मंजूर झालेली शिष्यवृत्ती चे पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये नूतनीकरण करण्यात येईल.
- मागील शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 60 टक्के नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे.
- मंजूर झालेली शिष्यवृत्ती रक्कम ही विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
- वरील अटी व शर्ती प्रमाणे केंद्र शासनाच्या दिनांक 22.1.2015 तसेच सन 2016-17 च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले अन्य सर्व अटी व शर्ती या योजनेस लागू राहतील.
- सदर शिष्यवृत्ती योजने करिता आवश्यक निधी हा केंद्राचा 75% राज्याचा 25% असा असतो.
- ही योजना केंद्र शासनाची मर्यादित निधी योजना आहे या योजनेसाठी आवश्यक तरतूद सन 2018-19 आर्थिक वर्षापासून वार्षिक योजने अंतर्गत राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
D.N.T. Dr.Ambedkar pri matrick scholarship विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मिळणारी रक्कम
- इयत्ता पहिली ते आठवी रू प्रतिमाह 100/- रू
- (दहा महिन्यांसाठी 1000 रू.)
- इयत्ता नववी ते दहावी साठी प्रतिमाह रू.150/-
- (दहा महिन्यांसाठी 1500 रू.)
निर्वाह भत्ता दहा महिन्यांकरिता
वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी
- गट 1 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 1200/-
- गट 2 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 820/-
- गट 3 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 570/-
- गट 4 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 380/-
वस्तीगृहात न राहणारे विद्यार्थी
- गट 1 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 550/-
- गट 2 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 530/-
- गट 3 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 300/-
- गट 4 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी रू 230/-
शिष्यवृत्ती चा अर्ज कोठे व कोणा मार्फत करावा.
- शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी तो शिकत असलेल्या शाळेमार्फत (मुख्यध्यापक/प्राचार्य) अर्ज करावा
- तालुकास्तर
- पंचायत समिती समाज कल्याण शिष्यवृत्ती विभाग प्रमुख.
- जिल्हास्तर
- समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
![]() |
DNT डॉ.आंबेडकर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
Post a Comment