Bharat Sarkar Pri Matrick Scholarship भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळे मधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने दिनांक १ जुलै २०१२ पासून  इयत्ता ९  वी व  १० वी मध्ये शिकत असणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याच्या दृष्टीने विचारधीन होते.केद्र शासनाने त्यांच्या दिनांक २२/०६/२०१२ च्या पत्रानुसार Bharat Sarkar Pri Matrick Scholarship भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना ही  इयत्ता ९  वी व  १० वी मध्ये शिकत असणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०१३-२०१४  या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

Bharat Sarkar Pri Matrick Scholarship

(Bharat Sarkar Pri Matrick Scholarship )सदरील शिष्यवृत्ती ही इयत्ता ९  वी व १० वी मध्ये शिकत् असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 

अटी व शर्ती 

  • शासकीय मान्यता प्राप्त शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाभ घेता येईल
  • सदरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पनाची मर्यादा ही दोन लक्ष रु.२०००००/- इतकी असावी.
  • या मध्ये विद्यार्थ्यांना किमान गुणांची कोणतीही अट नाही.
  • या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यमिक पुर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही. 
  • या शिष्यवृत्ती करीता राज्य स्तरावर सहआयुक्त (शिक्षण ) समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांना व जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी (वर्ग )बृह्मुंबाई यांना तक्रार निवारण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे.
  • एकाच लाभार्थ्यास सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती  या दोन्ही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम.

अनिवासी 

  • शिष्यवृत्ती दर प्रतिमाह अनिवासी ( वसतिगृहात न  राहणारे ) रु १५०./- (दहा महिन्याचे एकूण रु १५००/-)
  • पुस्तके व तदर्थ अनुदान (वार्षिक ) अनिवासी ( वसतिगृहात न  राहणारे ) रु ७५०./-
  • अनिवासी लाभार्थ्यासाठी एकुण शिष्यवृत्ती रु २२५०/-

निवासी 

  • शिष्यवृत्ती दर प्रतिमाह निवासी ( वसतिगृहात राहणारे ) रु ३५०./-.(दहा महिन्याचे एकूण रु ३५००/-)
  • पुस्तके व तदर्थ अनुदान (वार्षिक ) अनिवासी ( वसतिगृहात  राहणारे ) रु १०००./-
  • निवासी लाभार्थ्यासाठी एकुण शिष्यवृत्ती रु ४५००/-

वरील प्रमाणे शिष्यवृत्तीशिवाय विनाअनुदानित शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता अतिरिक्त भत्ते पुढील प्रमाणे राहतील.

  • अंध विद्यार्थ्यासाठी वाचक भत्ता प्रतिमाह रु १६०/-
  • वसतीगृहात न राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वाहतूक भत्ता.प्रतिमाह रु १६०/-
  • दिव्यांग विद्यार्थ्याच्या सोबत्याकरिता भत्ता.प्रतिमाह रु १६०/-
  • दिव्यांग विद्यार्थ्याच्या मदतनीस करिता  भत्ता.प्रतिमाह रु १६०/-
  • मतीमंद विद्यार्थ्याकरिता शिकवणी भत्ता रु.२४०/-प्रतिमाह

सदरील शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कोणा मार्फत करावा याबाबत माहिती पाहूया

लाभार्थी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विहीत नमुन्यातील प्रपत्र भरून जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय,समाजकल्याण शिष्यवृत्ती विभाग प्रमुख/तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्या कडे माहीती जमा करावी.







पुढील अपडेट/अधिक माहिती साठी whatsapp group join करा.


Post a Comment

Previous Post Next Post