केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद शाळांना वेगवेगळ्या योजना पुरवल्या जातात.त्या पैकी एका योजनेची माहिती आपण सविस्तर पणे पाहणार आहोत.
समग्र शिक्षा योजनेमार्फत मोफत गणवेश योजनांमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणेशाचा लाभ देण्यात येतो. सद्यस्थितीत उपरोक्त शाळा मधील फक्त दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणेश योजनेचा लाभ मिळत नाही सदर विद्यार्थ्यांना देखील मोफत गणेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच मोफत गणेश योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ देण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे. सदरील निर्णय हा मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक 28 जून 2023 रोजी बैठकीमध्ये प्रस्तुत विषयास दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात आलेला असून शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश सोबत एक जोडी शुज दोन जोडी पायमोजे
शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजना पासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांकरिता दरवर्षी दोन मोफत गणेश उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मधील इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
Post a Comment