महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये विवध पदाची मोठी भरती.Zilha Parishad Bharati:2023

महाराष्ट्र राज्यात सध्या 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा आहेत परीक्षेचे पंचायत राज मधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम इसवी सन 1961 कलम क्रमांक सहा नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी जिल्हा सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना एक मे इसवी सन 1962 रोजी करण्यात आलेली आहे.

ज्या अधिनियमाद्वारे जिल्हा परिषदेची स्थापना होते. त्या अधिनियमा नवे किंवा तदनुसार अन्यथा. जिल्हा परिषदेकडे चे अधिकार व जी कार्य सोपवण्यात येतात त्या सर्व अधिकारांचा जिल्हा परिषदेने वापर केला पाहिजे. आणि ती सर्व कार्ये जिल्हा परिषदेने पार पडली पाहिजे असे तिच्यावर बंधन असते.

जिल्हा परिषद हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत येतो. जिल्हा परिषदेमधील जागा या जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर पंचायत समिती नियुक्त केलेले असतात.

Zilha Parishad Bharati:2023

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांनी सरळ सेवा पद्धतीने गट क संवर्गातील रिक्त पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. या पदासाठी पात्र आणि शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उच्च पदासाठी अधिक पदवी आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेमध्ये निघालेल्या विविध भरती बाबत सविस्तर माहिती पाहूया.

पद.

सर्व जिल्हा परिषद भरती- 2023 मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य महिला सेवक), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक,वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) या सर्व पदांचा समावेश आहे.

वेतनश्रेणी.

  • आरोग्य पर्यवेक्षक-S13:35400 ते 112400+महागाई भत्ता+ व इतर भत्तेनेमानुसार.
  • आरोग्य सेवक (पुरुष) 50% {हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी}-S08:25500 ते 81100+ महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला S -08-25500 ते 81100+ महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • औषध निर्माण अधिकारी S-10=29200ते 92300+ महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • कंत्राटी ग्रामसेवक-16000/- रू दरमहा मानधन.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा S-14: 38600 ते 122800+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • कनिष्ठ अभियंता विद्युत: S-14,38600 ते 122800+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • कनिष्ठ लेखा अधिकारी. S-13=35400 ते 112400+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा. S-6=19900 ते 63200+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • तारतंत्री. S-6= 19900 ते 63200+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • मुख्य सेविका/पर्यवेक्षिका.S-13=35400 ते 112400+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • पशुधन पर्यवेक्षक S-08=25500 ते 81100+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ. S-13=35400 ते 112400.+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • वरिष्ठ सहाय्यक.S-08=25500 ते 81100+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा.S-08=25500 ते 81100+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • विस्तार अधिकारी कृषी.S-13=35400 ते 112400.+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम लघु/पाटबंधारे) .S-08=25500 ते 81100+महागाई भत्ता व नियमानुसार इतर ध्येय भत्ते.

परीक्षा शुल्क.

  • GEN प्रवर्गातील उमेदवारांसाठी -1000/- रू.
  • SC/ST/अनाथ उमेदवारांसाठी 900/- रू.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी फी नाही.

परीक्षा ठिकाण.

निवड केलेल्या जिल्ह्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.
एकदा निवड केलेली केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

वयोमर्यादा.

18 ते 38 वर्ष (दोन वर्षे शिथिल म्हणून 18 ते 40 वर्षे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट देण्यात येईल)

शैक्षणिक पात्रता.

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

परीक्षेचे स्वरूप.

  • परीक्षा मराठी भाषेमध्ये ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची ऑनलाइन कम्प्युटरवर होईल.
  • सर्व पदासाठी 100 प्रश्नांची 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेसाठी 120 मिनिटे कालावधी असेल.
  • अपवाद तारतंत्री पदासाठी 50 प्रश्नांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेसाठी 60 मिनिटे वेळ असेल.
  • मेरीट यादीत येण्यासाठी उमेदवारांनी कमीत कमी 45 टक्के गुण घेणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक.

5 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023.

सर्वसाधारण सूचना.

  • या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे इतर कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असल्याने एकाच जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरावा.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • शासन निर्णय क्र 1007/प्र . क्र.36/का.36 दि.10/07/2008 नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेले 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारही फॉर्म भरू शकतात.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
नोकरी महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे त्या जिल्ह्यातील कोणत्याही भागात करावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.


Post a Comment

Previous Post Next Post