सरकारी अपडेट मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.आज आपण घेऊन आलेलो आहोत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी,यामध्ये पोस्टमध्ये निघाल्या जागांबाबत अधिक माहिती आपण पाहूया. काही दिवसांपूर्वी भारतीय डाक विभागात बीपीएम एबीपीएम या पदासाठी भरती निघाली होती.आता परत नव्याने डाग विभागाकडून दहावी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगा भरती सुरू करण्यात आलेली असून,त्याचे अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे.
पद.
- (GDS)- ब्रांच पोस्ट मास्टर BPM.
- (GDS)-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण रिक्त जागा
- 30,041
शैक्षणिक पात्रता.
- उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराची निवड ही १० वी च्या गुणांवर करण्यात येईल .
- संगणकाची बेसिक माहीती असावी / Ms-Cit हा कोर्स पुर्ण झालेला असावा.प्रमाणपत्र किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- संगणक हाताळता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा.
- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्ष. (खुला प्रवर्ग)
- SC,ST उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट असेल.
- OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी तीन वर्षाची सूट असेल.
परीक्षा फी.
- जनरल OBC,EWS उमेदवारासाठी १००/- रुपये.
- SC,ST दिव्यांग महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही.
पगार/वेतनश्रेणी पुढील प्रमाणे राहील.
- GDS-ब्रांच पोस्टमास्टर-10,000 ते 24,470
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर-12000/- ते 29350.
निवड प्रक्रिया.
उमेदवाराची निवड दहावीच्या गुणावर केली जाईल अधिक.नोकरीचे ठिकाण.
संपूर्ण भारतात.अर्जाची प्रक्रिया.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल.
- इतर कुठल्याही प्रकारे अर्ज केला तर त्याचा विचार करण्यात येणार नाही.
शेवटची दिनांक.
- 23 ऑगस्ट 2023.
- अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास दिनांक 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट कालावधीमध्ये करता येईल.
सर्वसाधारण सूचना
- भारतीय डाक विभागाच्या मेगा भरतीसाठी उमेदवारांना डाक विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून अर्ज करण्यात आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी डाग विभागाकडून देण्यात आलेली जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावी.
- संपूर्ण अर्ज भरल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी करावी त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे याची नोंदणी घ्यावी.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रकान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
Post a Comment