निपाह विषाणू काय आहे,विषाणूचा उगम कोठून ?कसा होतो फैलाव ?आजाराची लक्षणे कोणती ?काळजी काय घ्यावी ?What is Nipah virus, where does the virus come from? How does it spread? What are the symptoms of the disease? What care should be taken?

प्रस्तावना- Nipah Virus

निपाह विषाणू हा आरएनए "विषाणू" आहे. हा विषाणू पॅरामॉक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमतः १९९८ आणि १९९९ मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. 'फळांचे वटवाघुळ' म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात. ही वटवाघुळे पेट्रोपॉडीडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. हेनिपाव्हायरस हा पॅरामॉक्सोवाइरीडेचा नवीन प्रकार मानला जातो. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी व लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत.

निपाह विषाणू काय आहे,विषाणूचा उगम कोठून ?कसा होतो फैलाव ?आजाराची लक्षणे कोणती ?काळजी काय घ्यावी ?What is Nipah virus, where does the virus come from? How does it spread? What are the symptoms of the disease? What care should be taken?

निपाह विषाणू हा वटवाघुळात उपस्थित असतो. वटवाघुळ हे निपाह विषाणूचे राहण्याचे ठिकाण असे थोडक्यात म्हणले जाते. १९९८ मध्ये मलेशियात जेव्हा जंगलतोड झाली, तेव्हा जंगलातील वटवाघुळे मनुष्य व इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ लागली, विषेशतः डुक्कर. निपाह विषाणू हा वटवाघुळामधुन सर्वात आधी आजारी डुकरामध्ये पसरला व तेथून मनुष्याला लागण होऊन १९९८ ते १९९९ दरम्यान मलेशियात २६५ जणांचे बळी गेले. त्यानंतर हा विषाणू २००४ मध्ये बांग्लादेश मध्ये फळाच्या वटवाघुळाद्वारे पसरला व २०१८ मध्ये भारतातील केरळ राज्यात. केरळ राज्यातील काहींचा मृत्यू देखील झाला

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूची बाधा

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूची बाधा होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी दोघांना या विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात थैमान घालणारा कोव्हिड-१९ चा भारतातील पहिला रुग्णही केरळमध्येच आढळला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा सावध होऊन प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सज्ज झाल्या आहेत. आतापर्यंत विविध देशांमध्ये माणूस आणि प्राण्यांमध्ये या विषाणूचे संक्रमण होत असल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या प्रारंभी भविष्यातील संभाव्य साथींमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने निपाहचा समावेश केला असून त्याची लस व उपचारपद्धतींवर तातडीने संशोधन करण्याची गरजही व्यक्त केली आहे.

विषाणूचा उगम कोठून ? where does the virus come from 

अफ्रिका आणि आशियातील विविध देशांत वटवाघळांमध्ये या विषाणूचे अंश आढळल्याचे सांगण्यात येते. मलेशियातील ‘सुंगई निपाह’ या गावात १९९८-९९ मध्ये या विषाणूची मानवाला बाधा झाल्याचे आढळून आले, त्या गावावरूनच ‘निपाह’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्यावेळी मलेशियात १०८ जणांचा बळी गेला. सिंगापूरमध्येही याच काळात या विषाणूचे अस्तित्व आढळून आले. त्यानंतर बांगलादेशात २०१६ मध्ये या विषाणूच्या साथीने अनेक बळी गेले. खजुराच्या झाडातून स्त्रवणारा रस आणि खजुराची फळे खाल्यानंतर नागरिकांना याची बाधा झाल्याचे सांगण्यात येते. हीच फळे वटवाघळांनीही चाखली होती. बांगलादेशासह भारतातील सिलिगुडीमध्येही निपाहचे संक्रमण झाल्याचे आढळले. केरळमध्ये यंदा आढळलेले निपाहचे चौथे संक्रमण आहे. यापूर्वी २०१८ मध्ये केरळमध्ये २३ जण यात संक्रमित झाले आणि त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला होता. नंतर २०१९ आणि २१ मध्येही निपाहचे रुग्ण आढळून आले. आता केरळमध्ये आढळलेल्या रुग्णांमधील विषाणूचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच केंद्राची समितीही केरळमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी 

whatsapp group join करा.

कसा होतो फैलाव ? How does it spread?

हा ‘जुनोटिक’ प्रकारचा विषाणू असून आतापर्यंत झालेल्या संशोधनातून प्राण्यांवर, किंवा अन्न-पाण्यातूनही या विषाणूचा फैलाव होऊ शकतो, असे आढळले आहे. यापूर्वी वटवाघळे किंवा डुकरांमार्फत याचा फैलाव झाल्याच्या नोंदी आहेत. प्राण्यांसह माणसांकडून माणसांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

आजाराची लक्षणे कोणती ? What are the symptoms of the disease? 

या विषाणूच्या फैलावाचा वेग तुलनेने कमी असला, तरी तो जास्त धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. या विषाणूची बाधा झाल्यानंतर एक-दोन दिवसांतच त्याची लक्षणे दिसू लागतात.
  • प्रारंभी रुग्णाला तीव्र ताप येतो.
  •  तसेच अंगदुखी, 
  • घसा खवखवणे,
  • श्वास घेण्यास अडचण 
  • आणि उलटी होणे, 
अशीही लक्षणे दिसून येतात. या रुग्णांना न्यूमोनिया होऊ शकतो, तसेच आजाराची तीव्रता वाढल्यास ‘एन्सेफेलायटिस,’सारख्या विकारांची लागण होऊ शकते आणि रुग्णांची प्रतिकारशक्तीही मंदावत जाते.
निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं.

चिंतेची कारणे काय ?

प्रामुख्याने हा विषाणू मज्जासंस्था आणि मेंदूवर आघात करतो. त्यामुळे या विषाणूची बाधा झालेला रुग्ण लवकरच ‘कोमा’ मध्ये जाण्याची शक्यता असते. तसेच फैलावाचा वेग कमी असला, तरी या आजाराने रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक, म्हणजे ४० ते ७५ टक्के आहे. करोना काळात भारतात मृत्युदर अडीच ते तीन टक्के इतकाच होता. तसेच या आजारावर अद्याप लस किंवा औषधे तयार झालेली नाहीत.

काळजी काय घ्यावी ? What care should be taken?

अद्याप या रुग्णांवरील उपचारपद्धती (प्रोटोकॉल)निश्चित झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी वटवाघळे किंवा डुकरांच्या संपर्कात येणे टाळावे, आणि झडांवरून पडलेली-फुटलेली फळे खाणे टाळावे, तसेच मास्क वापरावा आणि वारंवार हात धुवावेत, असे खबरदारीचे उपाय सांगण्यात येत आहेत. अद्याप या आजाराच्या संदर्भात प्रवेश-प्रवासावरील निर्बंध किंवा ठिकठिकाणी चाचण्या करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने त्यांच्या नमुन्यांची तपासणी करणे आणि रुग्णांच्या विलगीकरणाद्वारे संभाव्य फैलाव रोखण्यास प्राधान्य द्यावे, अशी शिफारस संघटनेने सर्व आरोग्य यंत्रणांना केली आहे.

हे देखील वाचा 

Coal India bharati.2023.कॉल इंडिया लिमिटेड भरती.

सर्व सरकारीकामासाठी लागणार एकच प्रमाण पत्र, दि.१ ऑक्टोबर पासुन नवीन बदल

Indian Navy Bharti/Recruitment.2023. 

MIDC Bharati 2023.औद्योगिक महामंडळात 802 रिक्त पदांसाठी मोठी भरती.Midc Recruitment.Apply

Post a Comment

Previous Post Next Post