दिनांक एक ऑक्टोबर पासून होणार नवीन बदल, शाळेपासून,आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एकच आहे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
.png)
आता शाळेमधील प्रवेश असो ड्रायव्हिंग लायसन्स,आधार कार्ड,किंवा पासपोर्ट यासाठी अर्ज करायचा असेल किंवा मॅरेज रजिस्ट्रेशन करायचे असेल,तर वेगवेगळी सरकारी कागदपत्रे जमा करण्याची काहीही गरज नाही. आता या कामासाठी एकच सिंगल डॉक्युमेंट्स म्हणून बर्थ सर्टिफिकेट सादर केल्यास ही कामे होणार आहेत. एक ऑक्टोबर पासून लागू केलेल्या नवीन सुधारित कायद्यानुसार ही सुविधा मिळणार आहे. संसदेच्या मान्सून सत्रात बर्थ व डेथ रजिस्ट्रेशन सुधारित अधिनियम 2023 मंजूर करण्यात आला होता.त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदीमुर्मू यांच्या 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतिम मंजुरीनंतर जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारित विधेयक पास झाले होते. रजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारित विधेयक 2023 च्या कलम एकच्या उपकलम दोन अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत केंद्र सरकारला ही सूचित केले आहे. एक आक्टोबर 2023 पासून विधेयकातील तरतुदी लागू होतील.
सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
.png)
हा अधिनियम लागू झाल्याने शाळा कॉलेजातील प्रवेश ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड किंवा पासपोर्ट साठी अर्ज करताना तसेच मॅरेज सर्टिफिकेट साठी जन्म दाखला हे एककल्प प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. या नवीन विधेयकामुळे जन्म दाखल्याचे महत्त्व वाढणार आहे तसेच जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील डेटाबेस बनवण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा वाढणार आहेत.
Post a Comment