Red Bus MSRTC ST News. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा मोठा निर्णय. बस मधून मोफत प्रवास बंद.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अमृत योजनेच्या माध्यमातून 75 वर्षे नागरिकांसाठी एसटी मधून मोफत प्रवास योजना सुरु केली आहे .तसेच महिलांना देखील अर्धे तिकीट घेऊन प्रवास सुरू केलेला आहे,यामुळे महिला या योजनेचा लाभ घेतांना आपल्याला दिसत आहे.जे एका रूट वर नियमित ये-जा करतात अशा महिलांना या योजनेचा चांगलाच फायदा झाला आहे.
पण आता या श्रेणीतीलतील लोकांसाठी ही सवलत बंद करण्यात आली आहे.याबबत सविस्तर माहिती पाहुया.MSRTC गाड्यांमध्ये विविध सामाजिक गटांना सवलतीच्या दरात प्रवास केला जात आहे. अनेक सामाजिक गटांना त्यांचा फायदा होतो. आता एसटीने नुकतीच महिलांसाठी 50% सवलत जाहीर केली आहे. 75 टक्के वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत दिली जाते.
या लोकांचा मोफत प्रवास झाला बंद त्यांना द्यावा लागणार आता प्रवास भाडे.
गेल्या वर्षीपासून एसटी महामंडळाने अमृत योजनेतून 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर एसटी बसच्या सर्व वर्गातील महिलांसाठी अर्धे भाडे ही सवलत जाहीर केली.आहे त्यामुळे महिलांना मोठा फायदा झाला आहे.तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे.एसटी महामंडळ विविध सामाजिक गटानां प्रवास सवलत देते.
आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 च्या परिपत्रकानुसार सिकलसेल, एच.आय.व्ही. बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलिया रुग्ण इत्यादींना एसटी कडून मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या म्हणजेच वरील चार प्रकारच्या आजारी रुग्णांना निम आराम किंवा आराम बस मध्ये मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल,एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलीया या रुग्णांना आता फक्त (Red Bus) साध्या बस मधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एसटीच्या निम आराम हिरकणी वातानुकूलित अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाई बसेस मधून या दुर्धर आजारी व्यक्तींना मिळणारी सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने महाव्यवस्थापक परिवहन यांनी दिले आहेत.
Post a Comment