NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र शासन पुरस्कृत योजना सन २००७-८ या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी विद्यार्थिनींनी या परीक्षेसाठी पात्र असतात.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत केले जाते. इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थी यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. सदर विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान 55 टक्के गुण असावे (SC,ST,यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत) सदर परीक्षा मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,गुजराती,तेलगू,सिंधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते.
सदर परीक्षेचे शुल्क 100 रुपये व शाळा सलन्गंता शुल्क २०० रुपये आकारले जाते.सदर परीक्षेचा अभ्यासक्रम इयत्ता ८ वी पर्यंतच्या राज्य शासनाचा आहे. पेपर १ बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) (सामान्य ज्ञान- 35 गुण + सामाजिक शास्त्र- 35 गुण + गणित -20 गुण) दोन्ही पेपर साठी प्रत्येकी 90 गुण व वेळ 90 मिनिटे, सदर परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (11,682) कोट्यानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत तयार केली जाते.
शासन निर्णय क्रमांक 20 ऑगस्ट २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी अखेर चार वर्ष दरमहा 1000 रुपये प्रमाणे (वार्षिक रुपये 12000/-) शिष्यवृत्ती मिळते सन 2017-18 पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. नवीन व नूतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहित मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थी तसेच शिष्यवृत्तीचा लाभ PFMS मार्फत संबंधिताच्या बँक खात्यावर परस्पर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे जमा केली जाते.
उद्दिष्टे.
- इयत्ता आठवी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी.
- आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
NMMS शिष्यवृत्ती मिळणारी रक्कम
इयत्ता नववी ते इयत्ता बारावी अखेर चार वर्ष दर महीना एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक 12000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.पात्रतेचे निकष.
- पालकांची उत्पन्न 3,50,000/-हजार पेक्षा जास्त नसावे उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा असणे आवश्यक आहे.
- शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.
- केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वस्तीगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी वीरा अनुदानित शाळेतील खासगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहे.
- इयत्ता दहावी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
- इयत्ता दहावी मध्ये सर्व साधारण जनरल विद्यार्थ्यांसाठी पेक्षा अधिक गुण अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यास पाच टक्के सूट इयत्ता नववी मधून दहावी मध्ये गेलेले विद्यार्थी व अकरावी मधून बारावी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावानेच खाते असावे संयुक्त खाते नसावे.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्यांचे बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.
- विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्या शिष्यवृत्ती करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली करण्यात येईल.
- कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नुतीनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांचे आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाऊ शकत नाही.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे.
- सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन एम एस परीक्षेचे गुणपत्रक.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गत वर्षाचे इयत्ता नववी दहावी अकरावी गुणपत्रक.
- सक्षम प्राधिकारी यांच्यासह पालकाचा रुपये तीन लाख 50 हजार आतील उत्पन्नाचा दाखला.
- ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा जातीचा सक्षम पदाधिकारी यांच्या सहीचा दाखला.
- आधार कार्डची एक प्रत.
- बँक पासबुकची एक प्रत.
संपर्क कार्यालय.
- शिक्षणाधिकारी माध्यमिक योजना जिल्हा परिषद.
- गटशिक्षणाधिकारी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख.
- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.
योजनेची ऑनलाईन प्रक्रिया पुढीलप्रमाणे.
- NSP पोर्टलवर केंद्र शासनाकडून निवड झालेल्या नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करणे.
- NSP पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांची लॉगिन करून माहिती भरणे व फायनल सबमिट करणे.
- शाळा स्तरावर अर्जाची पडताळणी.
- विद्यार्थ्याने भरलेला फॉर्म अचूक आहे.
- विद्यार्थिनी भरलेला फॉर्म अचूक नसल्यास अर्ज बाद होईल.
- डिफेक्ट केलेले फॉर्म पुन्हा दुरुस्त करून भरणे.
- विद्यार्थ्याने भरलेला फॉर्म अचूक असल्यास
- जिल्हास्तरावर अर्जाची पडताळणी.
- विद्यार्थ्याने भरलेला फॉर्म अचूक आहे.
- विद्यार्थिनी भरलेला फॉर्म अचूक नसल्यास अर्ज बाद होईल.
- डिफेक्ट केलेले फॉर्म पुन्हा दुरुस्त करून भरणे.
- विद्यार्थ्याने भरलेला फॉर्म अचूक असल्यास
- केंद्र शासन स्तरावर नवीन व नूतनीकरण विद्यार्थी बँक खात्यामध्ये DBT मार्फत शिष्यवृत्ती जमा केली जाते.
Post a Comment