ABHA CARD आयुष्यमान भारत हेंल्थ अकॉउट.घरी बसल्या बनवा आपले व आपल्या मित्र मंडळींचे ABHA कार्ड

राज्यातील सर्व नागरिकांनी ABHA CARD काढावे असे राज्याचे मुख्यमंत्री  व सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत  आव्हान करण्यात आलेले आहे.आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (ABHA) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला असून राज्यातील सर्व नागरिकांसाठी हेल्थ कार्ड आवश्यक असल्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी असे आव्हान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेले आहे.

ABHA CARD

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि तीही डिजिटल सुरुवात मिळावी म्हणून आभार सुरू करण्यात आले आहे सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते त्याचप्रमाणे डॉक्टरांना सुद्धा मागील सर्व रिपोर्ट तपासून पहावे लागतात या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभार आरोग्य कार्ड दिले जाणार आहे आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत आरोग्य खाते होय आबा कारण नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणारा सून या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास चाचण्या केलेले उपचार इत्यादी माहिती साठवली जाणार आहे ही सर्व माहिती डिजिटल सुरुवात आबा कारभार साठवली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार निदान उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

"आभा " हेल्थ कार्ड च्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

ABHA Health कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • आधार लिंक मोबाइल क्रमांक.

हेल्थ कार्ड चे फायदे.

  • उपचार करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी (हॉस्पिटल/दवाखान्यात) तुमचे रिपोर्ट आणि कागदपत्र सोबत घेऊन जाण्याची गरज नाही.
  • आबा कार्ड मध्ये तुमचा ब्लड ग्रुप हजार मेडिकल इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती असेल.
  • ऑनलाइन उपचार तेली मेडिसिन ई फार्मसी पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील.
  • तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरीत्या तुम्ही हॉस्पिटल मेडिकल इन्शुरन्स यांना शेअर करू शकता.

ABHA Health कार्ड कसे काढावे.

तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरीही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने हेल्थ कार्ड काढू शकता.
मोबाईलच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने हे हेल्थ कार्ड कसे काढावे ते आज आपण पाहणार आहोत.
स्टेप:-1. 

आबा कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे अधिकृत संकेतस्थळ वर जावे लागेल.
healthid.ndhm.gov.in.
नंतर होम पेजवर Creat ABHA Number असे बटन असेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 2.

नंतर पुढच्या पेजवर तुमच्यासमोर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
म्हणजेच तुम्ही तुमच्या 1)आधार कार्ड 2)ड्रायव्हिंग लायसन चा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
टिप- जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.

स्टेप 3.

पुढच्या पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि I Agree वर क्लिक करून आय एम नॉट रोबोट
i am not robot वर क्लिक करायचे आहे.व कॅपच्या व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर Submit या बटनवर क्लिक करा नंतर आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो बॉक्समध्ये टाकून Next बटन वर क्लिक करा.

स्टेप 4.

त्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटीकेशन सक्सेसफुल Aadhar authentication successful. असा मेसेज दिसेल. आणि आधार मध्ये फीड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल ती एकदा चेक करून नंतर तुम्ही Next बटन वर क्लिक करा.

स्टेप 5.

आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो ABHA कार्ड लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करता कामी येईल.

स्टेप 6.

पुढच्या पेजवर तुमचा ABHA नंबर तयार झालेला मेसेज दिसेल हा नंबर ऑटोमॅटिक तयार होतो जसा आधार नंबर असतो तसा हा 14 अंकी नंबर लक्षात ठेवणे कठीण जाते त्यामुळे आभाने ABHA ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे की name1234@abdm. त्यासाठी तुम्ही आधी Link ABHA Address बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7.

आता तुम्हाला तुमचे आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्समध्ये ते टाईप करून create and link बटनवर क्लिक करायचे आहे नंतर तुमच्यासमोर ABHA नंबर ABHA अड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल.नंतर गो बॅक टू युवर आबा Go back to your ABHA बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 8.

आता लॉगिन करण्यासाठी तुम्हाला ABHA नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9.

आता तुम्हाला OTP साठी कोणत्या मोबाईल नंबर वर OTP पाठवावा ते विचारले जाईल आधार लिंक मोबाईल नंबर ABHA नंबर लिंक मोबाईल नंबर योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 10.

पुढच्या पेजवर तुमचे ABHA नंबर कार्ड हेल्थ कार्ड तयार होऊन येईल तुम्ही ते download Abha Number Card बटन वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

स्टेप 11.

जर ABHA कार्ड मध्ये काही माहिती चुकलेली असेल तर वरती my Account मेनू वर क्लिक करून Edit Details वर क्लिक करा आणि उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा तसेच तुम्ही set Password ऑप्शनवर क्लिक करून ABHA अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.
या डिजिटल ABHA आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ABHA CARD बनवून घ्यावे असे आवाहन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.



पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.





Post a Comment

Previous Post Next Post