राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक २ जुलै 2012 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. तर आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य योजना असून दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या भारत शासन निर्णय यावेळी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनांक 1/4/2022 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत काही बदल व विस्तारीकरण करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती त्यामुळे शासनाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
- सध्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतिवर्ष 5.रुपये लक्ष एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रति वर्ष 1.5 लक्ष एवढे आहे आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लाख करण्यात आलेले आहे.
- सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रिया (किडनीचे ऑपरेशन) साठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रुपये 2.5 लक्ष एवढी आहे ती वाढून आता 4.50 लक्ष एवढी करण्यात आलेली आहे.
- सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये बाराशे नऊ उपचार आहेत यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येत आहेत तर ३२८ मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संकेत 147 ने वाढ होऊन उपचार संख्या 1356 एवढी करण्यात येत आहे व 1356 एवढेच उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे महात्मा ज्योतिराव फुले जन-आरोग्य योजनेतील उपचार संख्या 360 ने वाढविण्यात येत आहे सदर १३५६ उपचारा पैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील (परिशिष्टे दोन ते पाच जोडली आहेत.)
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयाची संख्या १००० एवढी आहे सदर योजना या आधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमा लगेचच्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात 140 व सीमालगतच्या कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यात दहा अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे त्या व्यतिरिक्त दोनशे रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता अंगीकृत रुग्णालयाची संख्या १३५० इतकी झालेली आहे याशिवाय सर्व शासकीय रुग्णालय व या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील
आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्र धारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या दिनांक 14/10/2020 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ता अपघातासाठींची उपचारांची संख्या 74 वरून 184 वाढविण्यात येत आहे तसेच उपचाराच्या खर्च मर्यादा 30,000/- ऐवजी प्रति रुग्ण प्रति अपघात १.लक्ष एवढी करण्यात येत आहे.आणि या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन-आरोग्य योजनेत करण्यात येत आहे.सदर लाभार्थ्यांचा समावेश गट ड मध्ये करण्यात येत आहे यामध्ये लाभार्थ्यांच्या अ ब व क या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघात जखमी झालेले महाराष्ट्र बाहेरील देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश करण्यात येत आहे.
लाभार्थी घटक.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी घटक पुढीलप्रमाणे असतील.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना.
- सामाजिक आर्थिक व जातनिहाय (SECC)जनगणनेत नोंदणीत समाविष्ट कुटुंबे
- अंतोदय अन्न योजनेतील कुटुंबे
- तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेली कुटुंबे.
(MJPJAY) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना.
गट अ- पिवळी अन्नपूर्णा योजना आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
- शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे (शासकीय निम शासकीय कर्मचारी यासह)
- व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांचा ही समावेश होईल.
- गट व गट ब मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक
- शासकीय शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी .
- शासकीय शासनमान्य अनाथ आश्रमातील मुले.
- शासकीय शासनमान्य महिला आश्रमातील महिला.
- शासकीय शासन मान्यवृद्धा आश्रमातील ज्येष्ठ नागरिक माहिती.
- जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेर रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे.
- लाभार्थ्याच्या अ ब क या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या महाराष्ट्र बाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.
लाभार्थ्याची ओळख.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
वर एक येथे नमूद केलेल्या लाभार्थी घटकांमधील लाभार्थ्यांना लाभार्थी ओळख प्रणाली अंतर्गत ई-कार्ड्स वितरित करून त्याद्वारे ओळख पटवली जाईल.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
गट अ- शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र.
- शुभ्र शिधापत्रिका किंवा शिधापत्रिका नसेल तर अधिवास दाखला तहसीलदार दाखला व फोटो ओळखपत्र शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून योजनेच्या लाभाची दुरुस्ती टाळण्यासाठी कोणत्या शासकीय आरोग्य योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र.
- संबंधित संस्थेने दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र.
- अपघात ग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो.
- रुग्णालयांना पोलिसांनी कळविलेला फोटो.
- आधार कार्ड मतदान कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र.
Post a Comment