SSC JE 2023 Notification Out for 1324 Posts, Exam Date, Online Form Starts कर्मचारी निवड आयोगामार्फत Junior Engineer भरती 2023

नमस्कार सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण  कनिष्ठ अभियंता या पदाच्या 1324 जागांसाठी  होणाऱ्या भरती बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग  मार्फत (SSC JE) कनिष्ठ अभियंता पदाच्या 1324 जागांसाठी मोठी भरती होणार आहे.सर्वात अगोदर  Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग बाबत थोडक्यात माहीती जाणुन घेवूया.

SSC JE 2023 Notification

Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग

  • कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन हा ग्रुप सी साठी भरती प्रक्रिया राबवीत असतो.
  • सदरील भरती ही  पूर्ण भारतभर असते.
  •   Staff Selection Commission  आयोग केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांसाठी भरती करत असतो.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग केंद्र सरकारमधील विविध विभागातील तसेच संस्था यांच्या इंजिनिअरच्या जागांची भरती काढत असतो.
  • कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनिअर ही एक राष्ट्रीय स्तरावरची अभियांत्रिकी परीक्षा आहे
  • सदिल परीक्षेमध्ये विविध प्रकारचे अभियांत्रिकी शाखेतील अभियंता पदाच्या जागा भरण्यात येतात.
  • कर्मचारी निवड आयोगाने कनिष्ठ अभियंता ज्युनिअर इंजिनिअर या पदाच्या 1324 रिक्त पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
  • या रिक्त जागेसाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पद व रिक्त जागा

  • सिव्हिल इंजिनियर - 1095
  • मेकॅनिकल इंजिनियर -31
  • इलेक्ट्रिकल इंजिनियर -125
  • इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअर.-7

शैक्षणिक अहर्ता

  • सिव्हिल इंजिनिअर मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • मेकॅनिकल इंजिनियर. मान्यता प्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनियर ची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.
  • इलेक्ट्रिकल इंजिनियर. मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.
  • इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअर. मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.

परीक्षेबाबत अधिक माहिती पाहूया.

  • परीक्षेची तारीख.
  • पेपर एका ऑक्टोबर 2023 मध्ये होईल.
  • पेपर दोन ची तारीख अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल.

परीक्षेसाठी लागणारा शुल्क.

  • जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० /- रु. शंभर रुपये फीस राहील.
  • एससी एसटी अपंग महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही.

परीक्षेचे ठिकाण.

  • ऑनलाइन फॉर्म भरताना परीक्षेचे ठिकाण निवडण्याची सवलत देण्यात आलेली आहे.
  • उमेदवारीने आपल्या सोयीनुसार परीक्षेचे स्टिकर निवडावे.
  • सदर परीक्षेचे ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजी नगर, (औरंगाबाद),जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर,नांदेड,आणि पुणे हे परीक्षेसाठी केंद्र असतील याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
उमेदवारांनी परीक्षेसाठी ठिकाणा ची निवड केल्यानंतर परीक्षेच्या ठिकाणामध्ये कोणत्याही  प्रकारचा बदल करता येणार नाही.

परीक्षेचे स्वरूप कसे राहील याबाबत माहिती पाहूया

  • पेपर एक आणि पेपर दोन्ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये असेल.
  • पेपर एक आणि पेपर दोन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची कॉम्प्युटर बेस असेल सदरील परीक्षा ही संगणकी कृत असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • पेपर एक साठी 200 प्रश्न असून 200 गुण असतील यासाठी कालावधी दोन तासाचा असेल.
  • पेपर दोन साठी शंभर प्रश्न असून 300 गुण असतील यासाठी कालावधीत दोन तासाचा असेल.

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना.

  • सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • परीक्षेसाठी फॉर्म भरणारा  उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक .
  • उमेदवाराची निवड झाल्यानंतर भारतातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करावी लागेल.
  • सदरील जागेसाठी फॉर्म भरताना उमेदवारांनी जाहिराती काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाइन फॉर्म भरावा.

परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक 26 जुलै 2023 पासून 16 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.

सदरील परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास अधिकृत संकेतस्थळावर कळवल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी



पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.





Post a Comment

Previous Post Next Post