राज्यातील आरोग्य संस्थेमध्ये होणार नवीन ८३९ पदांची निर्मिती.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदाच्या ८३९ नवीन पद निर्मिती साठी मान्यता देण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत या मध्ये Health Deparment Post list बाबत माहीती शासननिर्णय मध्ये देण्यात आलेली आहे. .त्या अनुषगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक १८ जुलै २०२३ रोजी ८३९ जागा पद निर्मिती  बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .पदापैकी काही पदे ही बह्यस्रोत मार्फत भरण्यात येणार असल्याचे सदरील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे .महाराष्ट्र राज्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण ९४ आरोग्य संस्थाकरिता एकूण ३६१ नियमित पदे निर्माण करण्यास व ४७८ कुशल अकुशल बाह्ययंत्रणेद्वारा मनुष्य बळ सेवा उपलब्ध करून घेण्यास निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

health deparment

पदांचा तपशील येथे पहा .

  • नवीन पद निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्थाचा तपशील आपण सविस्तरपणे पाहूया.
  • प्रत्येक आरोग्य केंद्रात मंजूर नियमित पदे पुढील प्रमाणे .
  • १.बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता संख्या १.
  • २.सहाय्यक परिचारिका प्रसविका(ए.एन.एम.) १.
  • प्रत्येक उपउपकेंद्राकरिता  एकूण नियमित पदे २.
  • नवीन उपकेंद्राकरिता  एकूण नियमित पदे ६६ केंद्रासाठी प्रती केंद्र २ प्रमाणे एकूण १३२ .

👉प्रत्येक उपकेंद्राकरिता बाह्ययंत्रणेद्वारा घ्य्वायाच्या सेवा (कुशल/अकुशल )

  • १.अंशकालीन स्री परिचर मनुष्यबळ संख्या .१.
  • २.प्रत्येक उपकेंद्राकरिता बाह्ययंत्रणेद्वारा घ्य्वायाच्या सेवा (कुशल/अकुशल ) १.
  •  ६६ नवीन उपकेंद्रासाठी प्रती केंद्र १ प्रमाणे एकूण  ६६.
  • ६६ नवीन उपकेंद्राची यादी शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे .
  • नवी  उपकेंद्राची यादी याह्ण्यासाठी येथे क्लिक करा .

👉प्राथमिक आरोग्य केंद्र 

नवीन 18 प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये प्रत्येकी ५  नियमित पदे,काल्पनिक १० पदे या प्रमाणे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता विवरण पत्रात दर्शवल्याप्रमाणे एकूण ९० नियमित पदे करण्यास व १८० इतक्या मनुष्यबळसंखेच्या प्रमाणात सेवा बाह्ययंत्रणेद्वारा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

  • वैद्यकीय अधिकारी गट - अ १ पद .
  • वैद्यकीय अधिकारी गट - ब १ पद .
  • आरोग्य सहाय्यक पुरुष गट-क पद १ .
  • आरोग्य सहाय्यक स्री गट-क पद १ .
  • सहाय्यक परिचारिका .१ पद
  • आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक ५ नवीन आरोग्य केंद्रामध्ये एकूण ५ नियमित पदे.

👉नवीन ग्रामीण रुग्णालय 

ग्रामीण रुग्णालयातील दळवट त.कळवण येथील रुग्णालयाकरिता प्रत्येकी १० नियमित पदे व १६ मनुष्यबळ संखेच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारा सेवेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे .
ग्रामीण रुग्णालयातील पदाची संख्या व वेतन च्या माहितीसाठी शासन निर्णय पहा .

👉नवीन स्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती .

सातारा येथील १०० खाटांच्या स्री रुग्णालयासाठी एकूण ४२ नियमित पदे व एकूण  ५५ मनुष्यबळ संखेच्या मर्यादित  बाह्ययंत्रणेद्वारा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

👉 ट्रामा केअर युनिट.

नवीन ट्रामा केअर युनिट करिता दि.२६/०५/२००४ च्या आकृतीबंधानुसार १५ पदे असल्याने सांगोला जि.सोलापूर येथील ट्रामा केअर युनिट करिता प्रत्येकी ८ नियमित पदे व ७ मनुष्यबळ संखेच्या मर्यादित  बाह्ययंत्रणेद्वारा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

👉100 घाटांचे उपजिल्हा रुग्णालयाकरिता पदनिर्मिती (मौजे लोहगाव तालुका हवेली जिल्हा पुणे.)

प्रत्येक शंभर घाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता प्रत्येकी 94 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे मोजे लोहगाव तालुका हवेली जिल्हा पुणे 36 नियमित पदे व 58 बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
मान्यता देण्यात आलेल्या पदाचा तपशील व वेतन शासन निर्णयांमध्ये पहा.

                     श्रेनिवर्धन  व रूपांतरित रुग्णालय.

👉 ट्रामा केअर युनिटचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर.

 ट्रामा केअर युनिटचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करण्याकरिता ग्रामीण रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार प्रत्येकी 10 नियमित पदे व 16 बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ आवश्यक आहे याप्रमाणे तेलगाव जिल्हा बीड येथील   ट्रामा केअर युनिटचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याकरिता उर्वरित चार नियमित पदे निर्माण करण्यास व एकूण दहा मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

👉 उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग जिल्हा उस्मानाबाद येथील ५० खाटांच्या प्रामानाकानुसार  उर्वरित पदांची पद निर्मिती.

प्रत्येकी नवीन 50 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता 45 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला असून त्यातील 32 नियमित पदे व तेरा बाही यंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ याप्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे, तथापि यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे काही पदे मंजूर असल्यामुळे पन्नास घाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता उर्वरित एकूण तीन नियमित पदे निर्माण करण्यास व एकूण 16 मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

👉श्रेणीवर्धित तीन उपजिल्हा रुग्णालय 30 खाटांवरून 50 खाटापर्यंत.

ग्रामीण रुग्णालयाचे दिनांक 17.1.2013 च्या शासन निर्णयान्वये ३०  खाटावरून 50 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, सदर मूळ ग्रामीण रुग्णालयाची 26 पदे मंजूर आहेत आता 50 खाटापर्यंतच्या रुग्णालयाच्या आकृतीबंधा नुसार 45 पदापैकी सदर रुग्णालयासाठी प्निरत्मियेकी ८ नियमित पदे व १२ मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात  घ्यावयाचे सेवा याप्रमाणे एकूण चोवीस नियमित पदे निर्माण करण्यास व 36 इतक्या मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

👉 उपजिल्हा रुग्णालय निलंगा जिल्हा लातूर ५० खाटांवरून १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन.

50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याकरिता प्रत्येकी 25 नियमित पदे व 69 बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ आवश्यक आहे,याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय निलंगा जिल्हा लातूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रीनिवर्धन करण्याकरिता उर्वरित एकूण बारा नियमित पदे निर्माण करण्यास व एकूण 37 मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित बाहेर सेवा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


राज्यात नव्याने सथापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्था करिता पदनिर्मिती बाबत शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 

पुढील अपडेट/सरकारी योजना,शिष्यवृत्ती नोकरी संदर्भ ई.च्या अधिक माहिती साठी whatsapp group join करा.




Post a Comment

Previous Post Next Post