मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत रुग्णांना मिळणार 25000 ते 2 लक्ष पर्यत आर्थिक मदत.Chief Ministers Relife Fund,Apply,Hospital list,Aplication Form pdf.

सरकारी अपडेट मध्ये सर्वांचे स्वागत आहे,आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीची अर्ज पक्रिया,मिळणारा निधी,आजारांची यादी, वैद्यकीय उपचारासाठीच्या आवश्यक योजना बाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.मुख्यमंत्री सहायता निधी हा वीस गंभीर आजारांसाठी दिला जातो. लाभ मिळणाऱ्या आजारांची यादी खालील प्रमाणे.
मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत रुग्णांना मिळणार 25000 ते 2 लक्ष पर्यत आर्थिक मदत.Chief Ministers Relife Fund,Apply,Hospital list,Aplication Form pdf.

आजारांची यादी

  • कॉक लियर इम्प्लेंट (2 ते 6 वर्ष वयोगट )
  • हृदय प्रत्यारोपण.
  • यकृत प्रत्यारोपण.
  • किडनी प्रत्यारोपण.
  • फुफ्फुस प्रत्यारोपण.
  • बोन मॅरो प्रत्यारोपण.
  • हाताचे  प्रत्यारोपण.
  • हिप रिप्लेसमेंट.
  • कर्करोग शस्त्रक्रिया.
  • अपघात शस्त्रक्रिया.
  • लहान मुलांची शस्त्रक्रिया.
  • मेंदूचे आजार.
  • हृदयरोग.
  • डायलिसिस.
  • कर्करोग (केमोथेरेपी /रेडिएशन)
  • अपघात.
  • नवजात शिशुचा आजार.
  • गुडघ्याचे प्रत्यारोपण.
  • बर्न रुग्ण.
  • विद्युत अपघात तरुण.

मुख्यमंत्री सहायता निधी बाबत कार्यपद्धती.

  • रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणाची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसाह्य देय नाही.
  • आरोग्यासाठी शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राधान्याने कार्यवाही करावी.
  •  चॅरिटी हॉस्पिटल (मोफत सवलतीच्या दरात)
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम.(RBSK) (मोफत उपचार)

उपरोक्त तिन्ही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयाची सविस्तर माहिती व रुग्णांलयाची ची यादी या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सुचना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य MJPJAY योजना,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालय,यामधील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या परियोजनात उपलब्ध समिती निधीचा येतोचित वापर व्हावा म्हणून वरील ( महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालय)उपक्रम योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ दिला जातो.
राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते तसेच यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांना अर्थसहाय्यप्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत मिळणारी रक्कम

मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार रुपये 25000/-  10,0000/- एक लक्ष आणि महत्तम 2,00000/-दोन लक्ष आजारा निहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येते.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  • अर्ज विहित नमुन्यात असावा.
  • निदान व उपचारासाठी लागणारे वैद्यकीय खर्चाचे (Medical expenses Certicate) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • (खाजगी रुग्णालय असल्यास सिविल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे)
  • तहसीलदार कार्यालयाच्या उत्पन्नाचा दाखला.
  • (रू.160,000/- हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  • रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) बाळाचे आधार कार्ड असल्यास आईचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  • रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  • संबंधित आजाराचा रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • अपघात ग्रस्त  रुग्णांसाठी MLC रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर (Computer System) असल्याची खात्री करणे.
  • अर्थसाह्याची मागणी ईमेल द्वारे (aao.cmrf.mh@gov.in.) केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवून त्याच्या मूळ प्रति (Chief Ministers Relife Fund Office )मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे तात्काळ पाठविण्यात यावे.




Post a Comment

Previous Post Next Post