Indian Air Force Recruitment 2023.भारतीय वायुदलात होणार मोठ्या प्रमाणात भरती.बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.सुशिक्षित तरुणांना भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.भारतीय हवाई दल अग्निपथ योजना अंतर्गत अग्नीवीर वायू पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर या बाबत संपूर्ण माहिती आज आपण सरकारी अपडेटच्या माध्यमातून पाहणार आहोत.भारतीय वायुदलात त भरावयाचे एकूण जागा पदाचे नाव शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता वयाची अट अर्जासाठी फी नोकरीचे ठिकाण ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख व ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख याबाबत सविस्तर माहिती पाहुया
पद
अग्नि वायूअग्निवायु या पदासाठी बारावी मध्ये 50 टक्के गुणा सहित उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल्स कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा इंग्लिश भौतिकशास्त्र आणि गणित विषय गैरव्यवसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता पुरुष व महिलांसाठी
- पुरुष उंची -12.5 से.मी.
- महीला उंची -152.से.मी.
- छाती पुरुष
- फुगुन 5 से.मी. पेक्षा अधिक
वयोमर्यादा.
उमेदवाराचा जन्म 27 जुन 2003 ते 27 डिसेंबर 2006 या दरम्यानचा आसावा.नोकरीचे ठिकाण
- पुर्ण भारतात
- ऑनलाइन अर्ज भरण्याचा दिनांक 27 जुलै 2023 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
- अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत.
- सदरील भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारले जातील.
मिळणारे एकत्रित वेतन
- पहिल्या वर्षी-मासिक वेतन ३०,०००/- (प्रत्यक्ष हातात मिळणार २१०००/-)
- दुसऱ्या वर्षी - मासिक वेतन ३३०००/-(प्रत्यक्ष हातात मिळणार २३१००/-)
- तिसऱ्या वर्षी -मासिक वेतन ३६५००/- ते ४००००/- (प्रत्यक्ष हातात मिळणार २५५५०/-)
- चौथे वर्ष २८०००/-
- प्रत्यक्ष ७० % रक्कम ही अग्निवायू यांना मिळणार ३० % रक्कम ही अग्निवीर कॉपर्स फंडात जमा होणार व त्या मध्ये तितकीच रक्कम gol द्वारे अग्निवीर कॉपर्स फंडात टाकण्यात येणार.
- अशी ४ वर्षात जमा झालेली रक्कम अंदाजे रु १०.०४.लक्ष (व्याज वगळून ) सेवा निवृतीच्या वेळी दिली जाणार.
नियम अटी
- वायुसेना कायदा 1950 अंतर्गत अग्नि वायूची भारतीय हवाई दलात चार वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती राहील
- अग्नि वायू भारतीय वायुसेनेमध्ये एक वेगळी रँक तयार करेल जी इतर कोणत्याही विद्यमान पेक्षा वेगळी असेल भारतीय वायुसेना अग्नी वायूला चार वर्षाचा प्रतिपद्धतीच्या कालावधी पेक्षा जास्त ठेवण्यास बांधील राहणार नाही.
- भारतीय हवाई दलाने घोषित केलेल्या संस्थेच्या गरजा आणि धोरणाच्या आधारे चार वर्षाची सेवा पूर्ण केल्यावर अग्नी वायूला भारतीय हवाई दलाच्या नियमित केडरमध्ये एअरमन म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
- या अर्जाचा त्यांच्या चार वर्षाच्या व्यस्त कालावधीतील कामगिरी सह वस्तुनिष्ठ निकषावर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल, आणि अग्नी वायूच्या प्रत्येक विशिष्ट बॅच 25% पर्यंत IAF च्या नेहमी केडरमध्ये नोंदणी केली जाईल अग्नी वायूला भारतीय हवाई दलात पुढील नाव नोंदणीसाठी निवडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.
- पुढील नाव नोंदणीसाठी अग्नी वायूची निवड जर असेल तर भारत सरकारच्या निवडीच्या अटीनुसार असेल.
भारतीय सैन्य दलात होणारे भरतीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे या भरतीसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण पासून ते आयटीआय असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या नोकरीची माहिती इतरांना आपल्या मित्रमंडळींना नक्कीच पाठवा.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी व समजून घ्यावी जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
Post a Comment