महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग अंतर्गत Talathi bharati 2023 (गट क) संवर्गातील एकूण 4644 तलाठी पदांची सरळ सेवा भरती
नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ,आज आपण तलाठी भरती प्रक्रिया बाबत सविस्तरपणे माहीती पाहणार आहोत , पात्रता, शैक्षणिक अहर्ता , वयोमर्यादा ई.चला तर मग पाहुयात.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अंतर्गत तलाठी पदाच्या एकूण 4644 पदांसाठी सरळ सेवा भरती करण्यात येणार आहे सदर भरती जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
![]() |
- Talathi bharati 2023 तलाठी पदासाठी होणाऱ्या परीक्षेचा दिनांक या https://mahabhumi.gov.in
- संकेतस्थळावर व उमेदवाराला त्याच्या प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल.
- पदसंख्या व आरक्षण बाबत सविस्तर माहिती पाहूया.
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासन संबंधीत विभागाच्या सूचनेनुसार कमी अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
- पदसंख्या व आरक्षण मध्ये बदल झाल्यास याबाबतची सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिद्ध केली जाईल.
- महिला आरक्षित पदांसाठी उमेदवारांनी महिला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी अर्जामध्ये महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील
- खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरती निवड करिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना लक्षपूर्वक वाचावे.
- (पेसा) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय.
- शासन अधिसूचनानुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अहर्ता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
- स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार म्हणजे जे उमेदवार किंवा त्यांची कौटुंबिक साथीदार आई-वडील आजी-आजोबा हे 1950 पासून ते आजपर्यंत संबंधित जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्रात राहत आले आहेत असे अनुसूचित जमातीचे उमेदवार असा होय.
- अनुसूचित क्षेत्रातील उमेदवाराकडे त्या क्षेत्रातील स्थानिक मूळ रहिवासी असल्याबाबतचा महसुली पुरावा असणे आवश्यक आहे. उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्त देण्यापूर्वी त्यांनी अनुक्षेत्रामध्ये स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूल पुराव्या बाबत पडताळणी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना त्या क्षेत्रात नियुक्ती दिली जाईल.
१.अर्ज सादर करण्याचा कालावधी.दिनांक २६ जुन २०२३ ते दिनांक १८ जुलै २०२३ रात्री ११.५५.वा .पर्यंत .online पद्धतीने.
२. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २० जुलै २०२३.रात्री ११.५५ वा.पर्यंत .
परीक्षेचा दिनांक व कालावधी
https://mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल,उमेदवाराच्या प्रवेश पत्रावाद्वारे कळविण्यात येईल.
पदाच्या निवडीसाठी आवश्यक कागदपत्र कार्यपद्धती महत्त्वाच्या अटी व शर्ती
(सर्व उमेदवारांसाठी)
- तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile certificat) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- परीक्षार्थी कडे अधिवास (Domicile certificat) प्रमाणपत्र डोमासाईल उपलब्ध नसल्यास त्यांनी त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचा जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षार्थीने अर्ज केला किंवा विविध अहर्ता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
- आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास व जात वैधता प्रमाणपत्र निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
- सदरील तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरीत्या राबवली जात असली तरी सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करून त्यानुसार जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल.
- उमेदवाराची ज्या जिल्ह्यामध्ये निवड यादी जाहीर झाली अशा पात्र उमेदवारांना संबंधी जिल्हा हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे निवडीतील उमेदवार आवश्यक ते कागदपत्र पडताळणी अंतिम वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी पूर्ण करून नियुक्ती देण्यात येईल नियुक्ती बाबतचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.
- अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी तपासण्यात येईल.
- तपासणीच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेले प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
- शैक्षणिक पात्रता.महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मुंबई यांच्याकडील अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन व विभाग नुसार संगणकाची अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाटत प्राप्त करणे बंधनकारक राहील.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- माध्यमिक शाळा परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा.
- खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावी.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमरोदय किमान 18 वर्षे अपेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावी.
- पदवीधर अंशकालीन उभेदेवारांसाठी वयोमर्यादेही कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
- स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादा ही महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील.
- खेळाडू उमेदवार, दिव्यांग उमेदवार, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त विविध उमेदवारांसाठी माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही सदर प्रपत्रामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग तलाठी पद भरती 2023
पुढील अपडेट/अधिक माहिती साठी whatsapp group join करा.
Post a Comment