सरकारी अपडेट मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे,आज आपण पाहणार आहोत तुम्ही घरी बसल्या तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता सहज व सोप्या पद्धतीने अपडेट करू शकता चला तर मग पाहूया अधिक माहिती.आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्ती साठी एक खूप महत्वाची ओळख आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे.सरकरी व इतर कोणत्याही कामासाठी आता आधार कार्ड हे आवश्यकच आहे.ज्या कार्ड मुळे आपली एक भारतीय नागरिक म्हणून ओळख आहे.त्या कार्डची संपूर्ण माहिती अचूक असणे आवश्यक आहे.आपल्याला आधार कार्ड वरील कोणतीही दुरुस्ती करावयाची असेल तर आधार शासकीय आधार सेवा केंद्रावर जावे लागत होते.आज आपण घरी बसल्या तुमच्या मोबाईल वरून आधार कार्ड वरील पत्ता किंवा इतर दुरुस्ती कशी करावी याबाबत सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत.
![]() |
आधार कार्ड चे फायदे
- सर्व सरकारी व खाजगी नोकरी साठी आवश्यक आहे .
- आधार कार्ड हि प्रत्येक व्यक्तीची भारताचा नागरिकत्व असल्याची एक प्रकारची ओळख आहे.
- एखद्या अनोळखी व्यक्ती बाबत माहिती घ्यायची असेल तर आधार कार्ड च्या माध्यमाने त्याची बरीच माहिती आपल्याला समजते.त्या व्यक्तिचे नाव, त्याचा पत्ता,जन्म तारीख फोटो.ई.
Update address in aadhar card
आता घरी बसल्या स्वतःच्या मोबईल च्या मदतीने आधार कार्ड वरील पत्ता करा अपडेट
- येथे सहज व सोप्या पद्धतीने आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करा .
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करून आधार कार्ड वरील माहिती अपडेट करू शकता यासाठी अधिकृत संकेतस्थळ वर जाऊया,चला तर मग
- UIDAI - https://uidai.gov.in
- Home page वर 'My Aadhar' या पर्यायाला क्लिक करा.नंतर पुढील प्रमाणे
- Update Demographics Data & Check Status वर क्लिक करा
- पुढील पान येईल त्याच्यावर Login करा
- Enter Aadhar Fields वर तुमचा आधार क्रमांक टाका
- Captcha code अचुक टाका .
- Send OTP वर क्लिक करा
- त्या नंतर तुमचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- आलेल्या OTP अचुक Enter करा व Login वर क्लिक करा आता Online Update service वर क्लिक करा आणि Update Aadhar Online हा पर्याय निवडा आता पुर्ण माहिती काळजी पूर्वक वाचा व Address हा पर्याय निवडा आणि Proceed to update aadhar या पर्यायवर क्लिक करा.तुमच्या समोर जुना / अगोदरचा पत्ता येईल तो व्यवस्थित वाचा व नवीन पत्ता अचूक टाका
- नवीन पत्ता टाकतांना पत्ता हा इंग्रजी मध्ये आणि मातृभाषा मध्ये दोन्ही भाषेत टाका.
- ही प्रक्रिया करतांना तुम्ही तुमचा बदलण्यात आलेल्या पत्ता चा नमुमा समोर पाहू शकता.
- आता तुम्ही तुमच्या बदललेल्या पत्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्र Upload करा.
- आवश्यक बदल केल्यानंतर व नवीन पात्याची खात्री केल्यानंतर Submit the record या पर्यायावर क्लिक करा पत्ता बदलण्यासाठी केलेली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर /Submit कल्यानंतर तुम्हाला 50 रु हे ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील
- तुम्ही UPI,Net banking च्या माध्यमाने पेमेंट करू शकता.
- Aadhar update चे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक URN – Updated Request Number मिळेल
- या मिळालेल्या URN – Updated Request Number चा वापर करून तुम्ही वेळोवेळी तुमच्या आधार कार्ड ची स्टेटस तपासू शकता.
- आधार वर पत्ता बदलण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर 90 दिवसात बदल होईल आणि तुमचे अपडेट आधार कार्ड हे नवीन बदल केल्येल्या पत्यावर पोस्टाच्या माध्यमाने पोहचेल.
- महत्वाची सूचना
आधार कार्ड अपडेट बाबत सवीस्तर माहिती आपण पाहिली आहे.आता घरी बसल्या आपण स्वतःचे व आपल्या ओळखीच्या व्यक्तींचे आधार कार्ड अपडेट करू शकता.आधार अपडेट करताना पोर्टलवर दिलेल्या माहिती व सूचनांचे पालन करा.दिलेय्ल्या सूचना काळजी पूर्वक वाचा समजून घ्या वर दिलेली माहिती स्टेप बाय स्टेप करा आधारवर पत्ता अपडेट करा सरकारच्या माध्यमाने भविष्यात आधार बाबत काही बदल झाल्यास त्या नियमांचे पालन करा.
Post a Comment