Polio Vaccine Campaign 2024: पालकांनो लक्ष द्या! ३ मार्चला राज्यभरात राबविली जाणार पोलिओ लसीकरण मोहीम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलीस वर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन 3 मार्च 2024 रविवार रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.Polio Vaccine Campaign 2024:

Pulse polio dose 2024.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी'ही घोषवाक्य घेऊन तीन मार्च 2024 रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे; या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून;सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करावे. असे आवाहन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला केले आहे.


आरोग्य विभागाच्या या मोहिमे अंतर्गत राज्यातील पाच वर्षा खालील एक कोटी 13 लाख 70 हजार 443 बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरात एकूण 89, 299 बुत उभारण्यात आले असून; सुमारे दोन लाख 21 हजार पेक्षा जास्त कर्मचारी या बुथवर कार्यरत असतील. याशिवाय तीन कोटीपेक्षा अधिक घरांना मोहिमे अंतर्गत भेट दिली जाणार आहे. तसेच एकही बालक पोलिओच्या डोस पासून वंचित राहू नये यासाठी फिरती पथके आणि रात्रीचे प्रत्येकी कार्यरत असणार आहेत.

टास्क फोर्स

पल्स पोलिओ मोहिमे संदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्स बैठक घेण्यात आली असून;सर्व जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली आहे. अति जोखीमेच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घ्यावी अशा सूचना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. जिल्हा स्तराप्रमाणे तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा,तालुका ,आणि ग्रामीण स्तरावरी मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यातील पाच वर्षापर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस न घेऊ शकणाऱ्या वंचित बालकांना ग्रह भेटीदरम्यान पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये कोणकोणत्या संघटना सहभाग घेणार 

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच जागतिक आरोग्य संघटना; युनिसेफ; युएसएड लायन्स क्लब; रोटरी क्लब ;व स्वयंसेवी संस्था; तसेच बाल विकास विभाग; शिक्षण विभाग; परिवहन विभाग ;आदी विभागांचा सहभाग असणार आहे.

सरकारी योजनांच्या अधिक माहितीसाठी 

whatsapp group join करा.

Post a Comment

Previous Post Next Post