SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत 2,049 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

कर्मचारी निवड आयोग मार्फत 2,049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2049 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात.
SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत 2,049 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पदनाम / पदांची संख्या :

कर्मचारी निवड कमीशन मधील फेज 12 पदांच्या एकुण 2049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2049 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता

 ( Education Qulification ) : सदर पदांकरीता पदनिहाय इयत्ता 10 वी / 12 वी  / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) ;

 सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) 

जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ssc.gov.in/candidate-portal/one-time-registration/home-page या संकेतस्थळावर दिनांक 26.02.2024  पासुन ते दिनांक 18.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर इतर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी 

whatsapp group join करा.


Post a Comment

Previous Post Next Post