राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे राज्य मंडळांनी इयत्ता दहावी बारावीचे 20 जुलै रोजी घेतले जाणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतची माहिती कळवली आहे.(Maharashtra State board of secondary and higher secondary Education) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या इयत्ता दहावी बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत मात्र राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे राज्य मंडळांनी इयत्ता दहावी बारावी चे (10th and 12th supplementary examination) 20 जुलै रोजी घेतले जाणारे पेपर पुढे ढगे जाण्याचा निर्णय घेतला आहे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत माहिती कळवली आहे.
पुढे ढकललेला पेपर कधी होणार ?
राज्य मंडळातर्फे जुलै ऑगस्ट महिन्यात घेतली जाणारी इयत्ता दहावी बारावीची परीक्षा 18 जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे परंतु राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच राज्य शासनाने मुंबई रायगड इत्यादी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर राज्य मंडळांनी 20 जुलै रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे आता पुढे ढकलेला दहावीचा पेपर २ ऑगस्ट रोजी तर बारावीचा पेपर 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
निर्णयाचे सर्वत्र स्वागत
महाराष्ट्र राज्य मंडळांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 20 जुलै रोजी इयत्ता बारावीचा मराठी व इतर भाषा विषयांचा पेपर आहे तसेच इयत्ता दहावीचा मल्टी स्किल बेसिक टेक्नॉलॉजी या विषयांची परीक्षा आहे परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यामुळे 20 जुलै रोजी होणारे इयत्ता दहावी बारावीचे पेपर आता ऑगस्ट महिन्यात घेतले जाणार आहेत राज्यातील पुरुष परिस्थिती विचारात घेऊन राज्य मंडळांनी 20 जुलै रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
Post a Comment