भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कप 2023 टूर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे 18 वर्षीय प्रज्ञानंदचे टाईप ब्रेक मध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारा खेळाडू फाबीयानो करूआनाला 3.5-2.5 ने पराभूत केले आहे.
.png)
FIDE World Cup Chess Tournament.
भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या पुढे वर्ल्डकप 2023 टूर्नामेंटच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे. अठरा वर्षे प्रज्ञानंदने टायब्रेक मध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारा खेळाडू.फाबीयानो करूआनाला 3.5-2.5 ने पराभूत केले आहे. प्रज्ञानंदनी चमकदार कामगिरी करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.दोन सामन्यांची क्लासिकल सिरीज एक-एक ने बरोबरीत संपल्यानंतर भारतीय प्रज्ञानंदने खूप रोमांचक ट्रायब्रेकर मध्ये अमेरिकेच्या दिग्गज ग्रँडमास्टरला मागे टाकले. आता अंतिम फेरीत पडल्यानंतर सामना नार्वेच्या मॅग्नेस् कार्लसनशी होणार आहे.
रमेश बाबू प्रज्ञानंद बुद्धिबळातील ग्रँडमास्टर. बुद्धिबळ खेळात भारतातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून प्रज्ञानंदला ओळखलं जातं.तो दहा वर्षाचा असतानाच इंटरनॅशनल मास्टर बनला. तर बारा वर्षाचा असताना प्रज्ञानंद ग्रंडमास्टर झाला, त्यावेळी अशी कामगिरी करणारा प्रज्ञानंद सर्वात कमी वय असलेला दुसरा खेळाडू बनला होता. आता भारतातील बुद्धिबळाचे चाहते अशी आशा करत आहेत की तो फायनल मध्ये मॅग्नेस कारलं चा पराभव करेल.
भारतातील महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी दिल्या शुभेच्छा....
भारतातील महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि प्रज्ञानंदला ट्विटरवर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की प्रज्ञानंद फायनल मध्ये पोहोचला त्यांनी टायब्रेक मध्ये फाबियानो करूआनाचा पराभव केला. आणि त्याचा सामना मॅग्नेस कार्लस विरोधात होणार आहे. काय जबरदस्त प्रदर्शन आहे. विश्वनाथन आनंद भारतातील दिग्गज चेस प्लेअर आहेत त्यांनी वर्ष 2000 आणि 2002 मध्ये भिडे वर्ल्ड कपचा किताब जिंकला होता.सामना जिंकल्यानंतर प्रज्ञानंदने दिलेली प्रतिक्रिया.
- सेमी फायनल जिकल्यानंतर प्रज्ञानंद माध्यमांशी बोलताना म्हणाला की मला या टूर्नामेंटमध्ये मॅग्नेश विरोधात खेळण्याची जराही आशा नव्हती. मी फायनल मध्ये पोहोचेल असं मला वाटत नव्हतं. मी खेळात प्रचंड मेहनत घेण्याचा प्रयत्न करेल पुढे काय होतं ते पाहावं लागेल.
- प्रज्ञा नंदाच्या विजयासाठी अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे याशिवाय प्रियंका गांधी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही प्रज्ञा नंदला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारी नोकरी,बाबत अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
Post a Comment