Maharashtra Board Exam:2024.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी,मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून घेण्यात येणार आहे तर दहावी बोर्डाच्या परीक्षा एक मार्च पासून घेण्यात सुरू होईल याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया.

सरकारी नोकरी शालेय शिक्षण ई बाबत अपडेट मिळविण्यासाठी
whatsapp group join करा.
Maharashtra board exam 2024.पुढील वर्षी सन 2024 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) व बारावी (HSC) परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने (Maharashtra State board of secondary and higher secondary Education.) पुढील वर्षी फेब्रुवारी,मार्च मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा. (HSC Exam2024) 21 फेब्रुवारी 2024 पासून घेण्यात येणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam 2024) एक मार्च 2024 पासून घेण्यास सुरुवात होईल.
कधी होणार परीक्षा ?
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा मंडळाचे ९ विभाग.
राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक,औरंगाबाद,अमरावती,कोल्हापूर,लातुर आणि कोकण या विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेळापत्रक माहिती असेल तर अभ्यासाची तयारी करण्याचे नियोजन करता यावे त्यामुळेच पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ आणि मार्च २०२४ या कालावधीत होणारे परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे.
१० वी १२ वी परीक्षेला किती विद्यार्थी बसणार.?
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ बोर्ड दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा घेते पुढील वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील बोर्डाने सांगितली आहे.
इयत्ता बारावी साठी सुमारे 14 लाख विद्यार्थी बसू शकतात.
आणि दहावीसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 लाख आहे.
पुरवणी परीक्षेसाठी सुमारे दहावी आणि बारावी मिळून सहा लाख विद्यार्थी अपेक्षित असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. राज्यात सुमारे 21000 शाळांत (SSC) आणि 7000 माध्यमिक,ज्युनियर महाविद्यालय एच एस सी विद्यार्थी आहेत.
Post a Comment